Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मार्च पण संपत आला, अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही; लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana February Installment Update: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. मार्च महिना संपत आला तरीही हप्ता न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?

मार्च संपत आला तरी ₹१५०० आले नाहीत

या दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडलेला आहे. मार्च महिना संपायला अवघे १० दिवस उरले असले तरीही अजून फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana February Installment Date)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मागच्या महिन्याचा हप्ता अजूनही दिलेला नाही. जानेवारी महिन्याचाही हप्ता लांबणीवर गेला होता. हा हप्ता फेब्रुवारीच दिला होता. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यात देतील, अशी शक्यता होती. मात्र, अजूनही हप्ता न आल्याने महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.

लाडक्या बहि‍णींना ₹३००० मिळणार?

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना दोन महिन्याचे हप्ते एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल महिन्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. १५ एप्रिलआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकर घोषणा करण्याची शक्यता आहे.

हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा (Ladki Bahin Yojana eKYC Update)

लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त केवायसी केलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमचा लाभ बंद झाला असेल. याचसोबत ज्या महिलांची केवायसीत चूक झाली आहे त्यांचाही लाभ बंद केला आहे. त्यांना केवायसीतील चूक सुधारण्यासाठी शेवटची संधी आहे. तुम्ही ३१ मार्चपर्यंत केवायसीत दुरुस्ती करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT