mukhyamantri mahila rojgar yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : ना ₹६००० ना ₹४५००, लाडक्या बहिणींच्या खात्यावर १५०० जमा; आताच बॅलेन्स चेक करा, आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana february installment ₹1500 : लाडकी बहीण योजनेत ४५०० नव्हे तर फक्त १५०० रुपये फेब्रुवारी हप्त्याचे वितरण सुरू. आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती. मार्च हप्ता कधी येणार, जाणून घ्या संपूर्ण अपडेट.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana February installment how to check ₹1500 payment : राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसांत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. राज्यातील महिलांच्या खात्यावर १५०० रुपये की ६ हजार रुपये येणार, याच्या चर्चा सुरू होत्या. लाडकी बहिणींना ३ महिन्यांचे पैसे एकत्र दिले जातील, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मात्र, राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी फक्त फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये जमा होतील, असे स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून २२७ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

जानेवारी २०२६ नंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एकही हप्ता आलेला नाही. मार्च महिना संपत आल्याने खात्यात एकाच वेळी ३ हप्त्यांचे पैसे येतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्याचे दुसरे कारण म्हणजे, राज्यातील लाडक्या बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सुरू आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात अनेकांनी ई-केवायसी केली, परंतु त्यात काही चुका झाल्यामुळे राज्य सरकारने दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत वेळ दिला होता. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पात्र महिलांच्या खात्यात एकत्र ३ महिन्यांचा हप्ता जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्य सरकारने आता या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात सध्या फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या? काय दिली माहिती?

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आदिती तटकरे यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करून दिली. पात्र महिलांसाठी फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार असल्याचे तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?

फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आजपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील लाखो महिलांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, मार्च महिनाही संपत आल्याने या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याची विचारणा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात येईल.

राज्यातील ८० ते ९० लाख महिलांचा लाभ बंद?

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा राज्यातील अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला होता. मात्र, २०२५ च्या अखेरीस राज्य सरकारने प्रत्येक महिलेचे ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला. कारण, अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व महिलांची ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर अपात्र महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेत आतापर्यंत ८० ते ९० लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा त्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्या सर्वांची नावे योजनेतून वगळण्यात आली असून, त्यांचा १५०० रुपयांचा लाभ यापुढे बंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT