Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Ladki Bahin Yojana E kyc : लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे. अनेक महिलांनी केवायसी करण्यास सुरुवातदेखील केली आहे. मात्र, केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. या परिस्थिती तुम्ही काय करावे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य

केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणी

ओटीपी येतोय पण पुढे प्रोसेस होत नाही? काय करावे?

लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. एवढेच नाही तर लाभार्थी महिलांच्या पती किंवा वडिलांचेही केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. या योजनेत केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. या काळात तुम्हाला ई केवायसी करायचे आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी ई केवायसी केले आहे.दरम्यान, अनेक महिलांना केवायसी करण्यात अडचणी येत आहेत.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना तुम्हाला आधार कार्डबाबत माहिती अपलोड करायची आहे. दरम्यान,यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. दरम्यान, अनेक महिलांना ओटीपी तर येत आहे मात्र, पुढे फॉर्म प्रोसेस होत नाहीये. त्यामुळेच महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महिलांना पुढे फॉर्मच भरता येत नाहीये. काही जणांनी खूप वेळा ओटीपी टाकून पुढे प्रोसेस करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचा काहीच फायदा होत नाहीये, अशा तक्रारी महिला करत आहेत.

ई केवायसी करताना अडचणी आल्यास काय करावे?

लाडकी बहीण योजनेत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायचे आहे. दरम्यान, यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती भरायची आहे. दरम्यान, या वेबसाइटवर हजारो महिला एकाचवेळी केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे साइट लोड होत नाहीये. यामुळे पुढे प्रोसेस पूर्ण होत नाहीये. त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी केवायसी करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी जास्त कोणी केवायसी करत नसेल. त्यामुळे रात्री १२ नंतर किंवा पहाटे केवायसी करण्याचा प्रयत्न करा. साइटवर जर खूप जणांनी एकत्र केवायसी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे केवायसी होत नाहीये.

केवायसी करता फेक वेबसाइट

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे फेक वेबसाइट. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फेक वेबसाइट सुरु करण्यात आल्या आहे. या वेबसाइटवर जाऊन तुम्ही केवायसी करु नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे केवायसी करताना नेहमी अधिकृत वेबसाउटवर जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Roasted Papad Side Effects: तुम्हीही पापड भाजून खाताय? मग होऊ शकतात हे गंभीर आजार, सवय आजच बदला

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेले MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

SCROLL FOR NEXT