Ladki Bahin e-KYC : ओटीपी येईना, वेबसाईटवर एरर, ई-केवायसी करताना लाडकीला अडचणीवर अडचणी

Ladki Bahin Yojana e KYC Process Documents Deadline Eligibility Details: महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी सक्तीची केली आहे. पण ग्रामीण भागातील महिलांना संकेतस्थळावर एरर, ओटीपी न येणे, लिहिता-वाचता न येणे अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Maharashtra Ladki Bahin Scheme E-KYC
Women in Maharashtra struggle with e-KYC process under Ladki Bahin Yojana due to OTP and website errors Saam TV Marathi News
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी सक्कीची करण्यात आली आहे.

  • केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली.

  • ई-केवायसी न केल्यास १५०० रुपयांची आर्थिक मदत बंद होणार.

  • ग्रामीण भागातील महिलांना संकेतस्थळ एरर, ओटीपी न येणे यांसारख्या अडचणी.

Maharashtra Ladki Bahin Scheme E-KYC : राज्यातील सर्व लाडक्या बहि‍णींना ई केवायसी करणं राज्य सरकारने सक्तीचे केलं. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून याबाबत अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींकडून केवायसी करण्यास सुरूवात केली. पण केवायसी करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. ग्रामीण भागातील महिलांना केवायसी करताच येत नाही. लिहिता वाचता येत नसल्यामुळे दुसऱ्यांकडून केवायसी करावी लागतेय. त्यातही अडचणी येत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकतेस्थळावर एरर येत आहे. तर काही मोबाईल क्रमांकावर ओटीपीच येत नाही, त्यामुळे लाडक्या बहि‍णींना त्रास सहन करावा लागत आहे. (How to complete e-KYC for Ladki Bahin Yojana Maharashtra)

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांची मदत दिली जाते. पण यामध्ये अनेक अपात्र महिलांनी घुसखोरी केल्याचे पडताळणीनंतर समोर आले. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रत्येकवर्षी ई केवायसी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नुकताच एक जीआर काढण्यात आला. त्यामध्ये महिलांना ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आले. केवायसी पूर्ण केली नाही, तर १५०० रूपयांची आर्थिक मदत बंद केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. Government decision makes e-KYC mandatory for Maharashtra women scheme

Maharashtra Ladki Bahin Scheme E-KYC
Beed Crime : वाल्मिक कराडच्या राईट हँडला मोठा दिलासा, पोलिसांकडून मकोका रद्द

केवायसी करण्यासाठी राज्यभरातील महिलांनी सुरूवात केली आहे. पण त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. काही महिलांना लिहिता-वाचता येत नाही, त्यामुळे दुसरीकडून केवायसी करावी लागते. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. केवायसी करताना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर एरर येत आहे. त्यामुळे तासंतास थांबावे लागत आहे. ई केवायसीसाठी आधार कार्ड टाकून लॉगिन केल्यानंतरही मोबाईलवर ओटीपी येत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजना संकेतस्थळावर लॉगइन होत नाही. लाडकी बहीण योजनेची केवायसी करायची तर कशी? असा सवाल राज्यातील महिलांकडून विचारण्यात येत आहे. What happens if women don’t complete e-KYC under Ladki Bahin scheme?

Maharashtra Ladki Bahin Scheme E-KYC
सोलापूरकरांसाठी मोठी आनंदवार्ता! मुंबई-बंगळुरूला एका झटक्यात पोहचा, आजपासून विमान तिकिटाचे बुकिंग

Ladki Bahin Yojana e-kyc Required Documents

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे लागणार आहे. या सोबत तुम्हाला नाव, वय, पत्ता अशी सर्व माहिती भरावी लागणार आहे. अर्ज करताना जी कागदपत्रे अपलोड केली होती. तीच कागदपत्रे पुन्हा एकदा अपलोड करावी लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com