
सोलापूर विमानतळावरून मुंबई व बंगळुरूला थेट विमानसेवा सुरू होणार आहे.
१५ ऑक्टोबरपासून फ्लाइट सेवा सुरू होणार आहे.
आठवड्यातून चार दिवस फ्लाइट्स राहतील, बुकिंग आजपासून उपलब्ध आहे.
Solapur to Mumbai direct flight booking Star Air : अखेर सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरूला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबरपासून सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरूला विमान झेपवणार आहे. याबाबतचे अधिकृत वेळापत्रक समोर आले आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी याबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबईहून सोलापूर प्रवास कऱणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तुळजापूर, पंढरपूर अन् अक्कलकोट यासारख्या देवस्थानाला जाणाऱ्यांची संख्या पाहून केंद्र सरकारने मुंबई-सोलापूर अशी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर विमानतळाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर Fly91 द्वारे सोलापूर-गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू कऱण्यात आली होती. आता सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबरपासून सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरूला विमान उड्डाण घेणार आहे. सोलापूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. (Star Air announces Solapur to Mumbai and Bengaluru flights starting October 15 – booking now open )
राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूरहून दोन नव्या मार्गावर विमानसेवा सुरू कऱण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, सोलापूर विमानतळावरून उड्डाणे सुरू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डाणे सुरू करण्यासाठी व्यवहार्यता अंतर निधी मंजूर केला आहे आणि स्टार एअर ही सेवा सुरू होईल. १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई-सोलापूर विमानसेवेचे उद्घाटन करणार आहेत. या मार्गावरील विमानसेवेसाठी २० सप्टेंबरपासून बुकिंगला सुरूवात होणार आहे.
सोलापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी विमानसेवा सुरू राहणार आहे. सोलापूरहून मुंबईला जाणारे विमान दुपारी १२.५५ वाजता उड्डाण घेईल. तर मुंबईहून सोलापूरला जाणारे विमान दुपारी २.४५ वाजता निघेल. सोलापूरहून बेंगळुरूला जाणारे विमान दुपारी ४.१५ वाजता उड्डाण घेईल. तर बेंगळुरूहून सोलापूरला येणारे विमान सकाळी ११.१० वाजता निघेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.