Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १५ दिवस!लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा, अन्यथा ₹१५०० होतील कायमचे बंद

Ladki Bahin Yojana eKYC Deadline: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ईकेवायसीमधील चुका दुरुस्त करण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे. ३१ मार्चपर्यंत तुम्हाला केवायसी करायची आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा

अन्यथा बंद होतील ₹१५००

लाडकी बहीण योजनेचे कोट्यवधी लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. जर निकषांमध्ये बसत नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये आता सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ बंद होणार आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती.

केवायसीत चुक सुधारण्याची शेवटची संधी

मुदतीपूर्वीअनेक लाभार्थ्यांनी केवायसी केले आहे. परंतु लाखो लाभार्थ्यांनी केवायसी केले नाही. याचसोबत अनेक महिलांनी केवायसीमध्ये चुका केल्या आहेत. या चुकांमुळे महिलांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान, आता त्यांना चुका सुधारण्यासाठी एक संधी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांनी प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला. दरम्यान, आता या चुका सुधारण्याची शेवटची संधी त्यांच्याकडे आहे. महिला ३१ मार्चपर्यंत केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकतात. यासाठी आता फक्त १५ दिवस उरले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनह केवायसी केले नाही त्यांनी लगेच करावे. अन्यथा महिलांना १५०० रुपयांचा लाभ कायमचा बंद केला जाईल.

लाखो महिलांचा लाभ बंद

लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचा लाभ बंद केला आहे. अनेक महिला निकषात बसत नाही तर अनेक महिलांनी केवायसी केली नाही. त्यामुळे त्यांचा लाभ बंद केला आहे. याचसोबत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन केलेल्या पडताळणीत महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT