Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: eKYC करताना चूक झाली? दुरुस्तीची ही शेवटची संधी; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ईकेवायसीत चूक झाली असेल तर ते दुरुस्त करण्याची शेवटची तारीख तुमच्याकडे आहे. तुम्ही ३१ मार्चपर्यंत केवायसी करु शकता.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

केवायसीमधील चुक सुधारण्याची शेवटची संधी

या तारखेपर्यंत करता येणार केवायसी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी न केल्यास महिलांचा लाभ बंद केला गेला आहे. दरम्यान, अनेक महिलांनी केवायसीमध्ये काही चुका केल्या आहेत. यामुळे त्यांचाही लाभ बंद झाला आहे. या महिलांसाठी सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता महिलांना केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेवटची संधी मिळाली आहे.

केवायसी करण्याची शेवटची संधी (Ladki Bahin Yojana eKYC Deadline)

लाडक्या बहि‍णींनी केवायसी केले आहे. परंतु केवायसीमध्ये काही प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. या महिलांना डिसेंबरपासून पैसे मिळत नाहीये. त्यामुळे महिलांच्या मनात निराशा झाली आहे. दरम्यान, आता त्यानंतर या महिलांना केवायसीमध्ये दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महिला ३१ मार्च २०२६ पर्यंत केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकतात. पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी त्यांना मिळाला आहे. यामध्ये त्यांना योग्य माहिती भरायची आहे. यानंतर पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे. एप्रिलपासून सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.

या महिलांना मिळणार ६००० रुपये (Ladki Bahin Yojana These Women Will Get 6000 Rupees)

लाडकी बहीण योजनेत केवायसीमधील चुकांमुळे महिलांचा डिसेंबरपासूनचा लाभ बंद झाला आहे. आता हा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे. एप्रिलमध्ये त्यांना सर्व रखडलेल्या हप्त्यांचे पैसे एकत्र देणार असल्याचे बोलले जात आहे. महिलांच्या खात्यात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे ४ महिन्याचे हप्ते एकत्र दिले जातील, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

SCROLL FOR NEXT