पैसे दुप्पट करायचेत? आधी बातमी वाचा! सय्यद टोळीने मुंबईतल्या व्यावसायिकाला असा लावला ४१ लाखांचा गंडा

Mumbai businessman cheated in investment scam details : मुंबईतील व्यावसायिकाला गुंतवणूक दुप्पट करण्याच्या आमिषाने ४१ लाखांचा गंडा. सय्यद पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू.
investment scam Mumba
investment scam MumbaSaam TV marathi
Published On

How double money scams trap investors India : कमी वेळात जास्त नफा आणि गुंतवणूक दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून लाखो, कोट्यवधी रूपयांचा चूना लावला जातो. आशाच आमिषांना बळी पडलेल्या मुंबईतील एका व्यावसायिकाचे प्रकरण समोर आले आहे. सय्यद पुत्रा-पुत्रांनी मुंबईतील एका प्रतिष्ठित शिपिंग व्यावसायिकाला तब्बल ४१ लाख रुपयांचा चुना लावलाय. याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी झाकिरुद्दीन सय्यद आणि त्याच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीमुळे मुंबईतील संपूर्ण उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. अनिस खान यांनी यांनी सय्यद पिता-पुत्रांविरोधात पोलिसांत तक्रार दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिस खान हे शिपिंग व्यवसायात कार्यरत आहेत. आरोपी झाकिरुद्दीन सय्यद याने आपल्या शेहबाज सय्यद आणि जबिल सय्यद या दोन मुलांच्या मदतीने अनिस खान यांना गंडवले. "आमच्याकडे गुंतवणुकीच्या अशा योजना आहेत, ज्यातून तुम्हाला केवळ तीन महिन्यांत लाखोंचा नफा मिळेल," असे आमिष त्यांनी दाखवले. व्यावसायिक कर्जाच्या नावाखाली त्यांनी अनिस खान यांच्याकडून तब्बल ४१ लाख रुपये उकळले. अनिस खान यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.

investment scam Mumba
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! फक्त याच लाडक्या बहि‍णींना eKYC करता येणार, पाहा नवा बदल

४१ लाखांवर तीन महिन्यांत २० लाख रुपये अतिरिक्त व्याज म्हणजेच एकूण ६१ लाख रुपये परत देण्याचे आश्वासन या सय्यद पिता पुत्रांनी दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतर जेव्हा अनिस खान यांनी आपल्या पैशांची विचारणा केली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खान यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे. सय्यद टोळीने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का? याचा तपासही केला जात आहे.

investment scam Mumba
Maharashtra Infrastructure : मुंबई-नाशिकचा प्रवास मुंबई-पुण्यासारखा होणार, मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, १० हजार कोटींचा मोठा निर्णय

पोलिसांन तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी झाकिरुद्दीन सय्यद हा केवळ मुंबईतच नाही, तर पुण्यातही सक्रिय होता. पुण्यातील ओतूर पोलीस ठाण्यातही सय्यद याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सय्यद याने पुण्यात बांधकाम व्यावसायिक असल्याचे भासवून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सय्यद याने आपल्या दोन्ही मुलांच्या मदतीने आता मुंबईतील मुंबईतील बड्या व्यावसायिकाला टार्गेट केलेय.

investment scam Mumba
Accident : एसटी बस अन् कारचा भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com