Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : eKYC ची मुदत वाढली की नाही? लाडक्या बहि‍णींच्या सरकारकडे नजरा, वाचा नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended Or Not: लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची मुदतवाढ काल संपली. दरम्यान, अजूनही लाखो महिलांचे केवायसी बाकी आहे. त्यामुळे आता केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींच्या केवायसीची मुदत संपली

केवासीसाठी मुदत वाढवणार का?

अजूनही लाखो महिलांचे केवायसी बाकी

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींना केवायसी करण्याची मुदत संपली आहे. केवायसीची मुदत संपल्याने आता उरलेल्या महिलांना केवायसी करता येणार नाही. दरम्यान, अजूनही लाखो महिलांनी केवायसी केले नाही. त्यामुळे केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

लाडकीच्या केवायसीसाठी मुदत वाढली की नाही? (Ladki Bahin Yojana KYC Deadline Extended Or Not)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. आता ही मुदत संपून नवीन वर्ष सुरु झाले. अनेक महिलांचे केवायसी झाले नाही. त्यामुळे केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली जात होती. जेणेकरुन महिलांना केवायसी करण्यासाठी अजून वेळ मिळेल. मात्र, सध्या तरी केवायसीसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.

४५ लाख महिलांचे केवायसी बाकी

लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच लाख लाभार्थी महिला आहेत. त्यातील लाखो महिलांनी केवायसी केले नाहीत. जवळपास ४५ लाख महिलांनी केवायसी न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता डेडलाइन वाढली नाही तर या महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात (Ladki Bahin Yojana November Installment Recieve From Today)

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना १५०० रुपये मिळाले आहे. काही महिलांना आज पैसे मिळतील. दरम्यान, यामध्ये आता केवायसी न केलेल्या महिलांना पैसे मिळणार की नाही असाही प्रश्न विचारला जात आहे. याबाबत अजूनही कोणती माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT