Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: कामाची बातमी! लाडक्या बहिणींनो 'हे' काम करा,अन्यथा मिळणार नाहीत ₹१५००

Ladki Bahin Yojana E KYC Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट

लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य

केवायसी केले नाही तर मिळणार नाहीत पैसे

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवायसी करणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही ई केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत २६ लाखांहून अधिक महिलांनी योजनेतून बाद केले आहे. यानंतरही अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचे समोर आले आहे. जर तुम्ही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी अपूर्ण माहिती दिली होती. याचसोबत नियमांचे उल्लंघन केले होते. त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळेच आता पुन्हा एकदा सर्व लाभार्थी लाडक्या बहि‍णींची ई-केवायसी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या केवायसीमध्ये ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

या महिलांना मिळणार नाही पैसे (These Women Will Not Get Ladki Bahin Yojana Money)

ज्या महिलांनी योजनेच्या निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. तसेच ज्या महिलांना ई केवायसी करण्यास सांगितले आहे. ई-केवायसी करुन फेरपडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या लाभार्थ्यांनी निकषाबाहेर आहेत त्यांचा लाभ बंद होणार आहे.

लाडक्या बहिणींना ऑगस्टचे पैसे कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana August Month Installment)

लाडकी बहीण योजनेत ऑगस्टच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिना संपायला अवघे ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जर अजून दोन दिवसांत घोषणा झाली नाही तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सप्टेंबर महिन्यातच दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: कार्तिक शुक्ल अष्टमीचा शुभ संगम; या राशींसाठी धार्मिक कार्य, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक लाभाचे संकेत

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

SCROLL FOR NEXT