Ladki Bahin Yojana news  Saam tv
बिझनेस

मोठी बातमी! लाडकीचे पैसे लाटणाऱ्या भावांना महिन्याचा अल्टिमेट, घरी नोटीस धडकणार, सरकार अ‍ॅक्शनमोडमध्ये

Ladki Bahin Yojana Notice Send To Ineligible Brothers: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी लाभ घेतला आहे. आता या पुरुषांच्या घरी नोटीस पाठवण्यात आली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भावांवर कारवाई

१५०० पुरुषांच्या घरी नोटीस पाठवल्या

पैसे परत करण्यासाटी दिली एका महिन्याची मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता ज्या पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जवळपास १४ हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला आहे. ११ महिन्यांपासून पुरुष या योजनेचा लाभ घेत आहेत. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ४३० पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या पुरुषांकडून २३.१० कोटी रुपये वसूल केले जाणार आहे. त्यासाठीची रक्कम परत करण्यासाठी महिनाभराची मुदत दिली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकता. या योजनेत २१ पेक्षा कमी आणि ६५ पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीही अर्ज केले आहेत. तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. एका कुटुंबातील फक्त दोनच महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, त्यातील काही महिलांनी सांगितले की, रेशनकार्ड वेगळे आहे. आम्ही योजनेसाठी पात्र आहोत. या सर्व गोष्टींचा पडताळणी केल्यानंतर अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहे.

दरम्यान, या लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत. या याद्या अंगणवाडी सेविकांकडे पाठवल्या जाणार आहे. त्यामधून प्रत्येक लाभार्थी महिलांची पडताळणी केली जाणार आहे. याचा अहवाल दिल्यानंतर अपात्र महिलांवर कारवाई केली जाणार असून त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. परंतु ही पडताळणी पूर्ण होईपर्यंत महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

महिला अपात्र होण्याची कारणे (Ladki Bahin Yojana Ineligible Reasons)

एका कुटुंबातील जर दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांच्या आणि वयोगटात न बसणाऱ्या महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवल्या आहेत. यामधील महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल. याशिवाय ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झालेला नाही, अशी माहिती रमेश काटकार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर यांनी दिली आहे.

बँकेशी बोलून अपात्र लाभार्थ्यांचा लाभ थांबवला जाणार

लाडकी बहीण योजनेत तब्बल ४२ लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे. त्यातील १४ हजार पुरुष आहेत. यातील काही महिलांचे उत्पन्न जास्त आहे, काही महिला सरकारी कर्मचारी आहेत. या अपात्र महिलांना सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. यामधील पुरुषांवर कारवाई होणार आहे. त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. पण शासकीय अधिकाऱ्यांकडून अर्जांची पडताळणी झाल्यावर एफआयआर दाखल करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे बँकेशी बोलून या लाभार्थ्यांची रक्कम रोखली जाईल व त्यांना नोटीस देऊन पैसे भरण्यास सांगितले जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahindra-Maruti Cars: स्वस्त किंमतीत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार, महिंद्रा आणि मारुतीची बाजारात होणार धमाकेदार एंट्री

Maharashtra Live News Update : भाजपचा कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gautami Patil : नाकात नथ अन् गुलाबी साडी; गौतमी पाटीलच्या नखरेल अदा, पाहा PHOTOS

Ambernath: नालेसफाईची तक्रार केल्याचा राग, भाजपा पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम', धाड टाकत पोलिसांकडून वेश्या व्यावसायाचा भंडाफोड; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT