राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली
कोथरुड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींना रुपाली चाकणकर यांनी फोन केला.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती रूपाली चाकणकरांनी दिली.
राज्य सरकारच्या यंत्रणेत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांची दोन हजारांहून अधिक पदे रिक्त असताना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नुकत्याच जाहीर झालेल्या गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीत पीएसआय पदांचा उल्लेखही नाही, ही बाब राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. परिणामी, सरकारच्या नियोजनशून्यतेवर आणि आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
मुंबई – सीबीआयने सहार एअर कार्गो, मुंबई येथे नियुक्त कस्टमचे अधीक्षक यांना 10.20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. कस्टम हाऊस एजंटकडून (CHA) माल साफसफाईसाठी प्रति किलो 10 रुपये दराने लाच मागण्यात येत होती.
अधिकाऱ्याने आधी क्लिअर केलेल्या मालावर 6 लाखांची मागणी केली होती. तर सध्या अडवलेला माल सोडण्यासाठी 10 लाख रुपये घेतले. 2 ऑगस्ट 2025 रोजी सापळा रचून अटक करण्यात आली असून न्यायालयाने 6 ऑगस्टपर्यंत पीसीआर मंजूर केला आहे. सीबीआय कडून चौकशी सुरू आहे.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील श्री सोमेश्वर मंदिरात सोमवारी हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. अभिषेक, पूजन, आरती यामध्ये भाविकांनी सहभाग घेत भक्तीभाव व्यक्त केला.
देशात असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज दुसर्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली.सकाळपासूनच भाविक भक्तांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला.दिवसभरात विविध राज्यातून हजारो भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.वैद्यनाथ मंदिर परिसरात श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
- आरोपी वाल्मीक कराडच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर निर्णय येणार.
- वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होणार
वाल्मीक कराड सोडता इतर सर्व आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर देखील सुनावणी होणार.
- विशेष सरकारी वकील उज्वल निकम येणार नसल्याची माहिती.
- विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब फुले आज विशेष न्यायालयात काम पाहणार
शहरातील गजबजलेल्या रामलिंग रोड परिसरात भरदिवसा आणि लोकवस्तीमध्ये चोरट्यांनी फिल्मी पद्धतीने पाठलाग करत लिफ्टमध्ये जात असलेल्या महिलेला लक्ष्य करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. गर्दी असतानाही चोरटे कोणालाही भीक न घालता निर्भीडपणे चोरी करून पसार झाले.ही घटना फक्त एकटी नाही. कालच याच परिसरात 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रकार घडला होता. दोन दिवसांत दोन महिला लुटल्या गेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी रोष आहे.
सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविली
नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी वेधशाळेने पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
आयएमडीच्या नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत आणि मासिक पाऊस आणि तापमानाचा अंदाज या दीर्घकालीन अंदाजानुसार ऑगस्ट – सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता
आयएमडीने दिलेल्या संभाव्य अंदाज नकाशांनुसार सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता
शहरात वाहतूककोंडीचा त्रास वाढत असतानाच, पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने नवा उच्चांक गाठला आहे.
-गेल्या दोन महिन्यांत मेट्रोने सातत्याने प्रवासीसंख्येत वाढ नोंदवली असून,जुलै महिन्यात तब्बल 59 लाख 58 हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला
-ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक प्रवासी संख्या आहे.
-पीएमपी तिकीट दरवाढीचा परिणाम मेट्रोच्या फायद्यात?
-1 जूनपासून पीएमपीने बसचे तिकीट दर वाढवले असून, याचा काहीसा परिणाम मेट्रोच्या प्रवाशांवर होत असल्याचे दिसते.
-महामेट्रोकडून सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे दोन मार्ग कार्यरत आहेत. लांब पल्ल्याची सुलभ, वेळेत आणि वाहतूककोंडीविना सेवा यामुळे प्रवाशांचा कल मेट्रोकडे झुकतो आहे. दररोज सरासरी 1 लाख 93 हजार नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत.
लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन भाव वाढीची अपेक्षा होती, भाववाढीच्या अपेक्षेने मागील हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवले होते, मात्र मागच्या एक वर्षापासून सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसली, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात सोयाबीन विक्री केली, तर सध्या बाजारात सोयाबीनची आवक कमी झाल्याने सोयाबीनचा दर 300 रुपयांनी वाढला आहे,4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल असा सोयाबीनला भाव मिळतो आहे. तर आवक घटल्याने, भाव वाढला आहे. मात्र शेतकऱ्याकडे सध्या सोयाबीन शिल्लक नाही. त्यामुळे वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना कसलाही फायदा होणार ,नसल्यास दिसत आहे.
जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या मोसंबी उत्पादक शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाला आहे. जालन्यातील घनसावंगी, जालना यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मोसंबी पिकाची जोपासना केली मात्र ऐन मोसंबीला फळ लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात फळगळती होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी मोसंबी फळगळतीमुळे चिंताग्रस्त झाला असून अनेक वर्षापासून जोपासलेल्या फळबागांवर फळगळतीचे मोठे संकट ओढावले आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करत आहे.
सांगलीच्या पोषण अधिपत्रामध्ये श्रावण मास निमित्ताने होड्यांचा शर्यती पार पडल्या.संकल्प फाउंडेशन कडून आयोजित करण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये कृष्णा व वारणा नदीकाठच्या 11 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने आणि थरारक अशा पार पडलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला तर कसबे डिग्रजच्या बोट क्लबने दुसरा क्रमांक पटकावला. दरवर्षी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये श्रावण महिन्यानिमित्ताने घोड्यांच्या शर्यती घेण्याची परंपरा आहे.कृष्णा नदी पात्रामध्ये रंगलेल्या या होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांनी कृष्णा नदीकाठावर गर्दी केली होती.
पंढरपूर शहरातील कराड रोडवरील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या कामासाठी हा भुयारी मार्ग आज पासून पुढे 25आॅगस्ट पर्यंत बंद राहणार आहे. या संदर्भात रेल्वे विभागाने लेखी पत्र दिले आहे. दरम्यानच्या काळात या मार्गावरून होणारी वाहतूक ही पुणे रोडवरील सरगम चौक आणि टाकळी रोड रेल्वे पुलाखालून वळवण्यात आली आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
श्रावण महिन्याचा दुस-या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकराची महादेव नगरी सजलीय
दुस-या सोमवारी पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करुन महाआरती शंखनाद करण्यात आला यावेळी भिमाशंकरच्या मंदिर आणि मुख्य गाभारा विविध फुलमाळांनी सजावट करण्यात आली दरम्यान हर हर महादेव, ओम नम शिवाय च्या जयघोषात महादेवाची नगरी दुमदुमुन गेली
पहाटेची महाआरती शंखनाद झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुल करण्यात आलं यावेळी रात्रीपासुन दर्शन मार्गावर असलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने भगवान शंकराची आराधना करत दर्शन घेतलं
यावेळी भिमाशंकर मंदिरातुन आढावा घेत भाविकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशी मध्ये ज्याने आरोप केले होते. त्या तक्रारदाराने आपली तक्रार नसल्याचे लेखी पत्र चौकशी समितीला दिले आहे. त्यामुळे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना क्लीन चिट मिळाली आहे.
आषाढी वारी काळात मंदिर समितीचा मंडप टाकण्याचा ठेका मिळवून देतो म्हणून व्यवस्थापकांनी टक्केवारी घेतल्याचा कथित आरोप करण्यात आला होता. त्यानंतर समितीने अॅड.माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने या प्रकरणी चौकशी केली असता तक्रारदाराने आपली याबाबत तक्रार नसल्याचं पत्र दिले आहे. मंदिर समिती आता तक्रारदारावर काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.
लातूर जिल्ह्यातल्या औसा इथ लातूर तुळजापूर महामार्गावर मध्यरात्री दरोडेच्या तयारीत असणाऱ्या 5 जणांच्या टोळक्याला लातूर पोलिसांनी ताब्यात घेत ,कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईत पोलिसांनी धारदार शस्त्रासह 5 जणांना ताब्यात घेतल आहे. तर सात लाख रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केलाय, दरम्यान मागच्या काही दिवसापासून जिल्ह्यातल्या अनेक भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे .,त्यामुळे नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि सावधगिरी बाळगण्याच आव्हान त्यावेळी पोलिसांनी केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मुंबई येथे 29 ऑगस्टला उपोषण करणार आहेत, तर या उपोषणास सहभागी होण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सकर मराठा समाजाने निर्धार केला आहे, सकल मराठा समाजाची लातूर येथे बैठक संपन्न झाली, या बैठकीत चलो मुंबई, या आंदोलनाच्या अनुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना गावात दिल्या आहेत., यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
जानेवारी ते जुन या सहा महिन्याच्या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील वाहनधारकांना एक कोटी 51 लाख 4 हजार 900 रुपयांचा दंड टोटवण्यात आला आहे चार चाकी दुचाकी आणि मालवाहू वाहन चालकांकडून सर्रास वाहतूक नियम मोडले जातात त्यामुळे कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा वाहतूक शाखेच्या सहा उपविभागातील पथकाने अशा नियम मोडणाऱ्यांना हेरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
रत्नागिरी - निवळी येथे गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी
निवळी - गणपतीपुळे रोडवरची घटना; वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही
मागील दोन महिन्यातील तिसरी घटना
पलटी झाल्यानंतर गॅस लिकेजचा कोणताही धोका नाही
जखमी टँकर चालकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.