Nanded Crime
Nanded CrimeSaam Tv News

स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम', धाड टाकत पोलिसांकडून वेश्या व्यावसायाचा भंडाफोड; नांदेडमध्ये खळबळ

Shocking Nanded Crime: नांदेडमधील रेड ओक स्पा सेंटरवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड. भाग्यनगर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची केली सुटका.
Published on
Summary
  • नांदेडमधील रेड ओक स्पा सेंटरवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड

  • भाग्यनगर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची केली सुटका

  • पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल; तिघांना अटक, दोन फरार

  • १६,५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नांदेडच्या कॅनल रोडवर हा प्रकार सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. तसेच ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून, दोघे अद्याप फरार आहेत. तसेच पोलिसांनी स्पा सेंटरमधून चार महिलांची सुटका केली आहे.

नांदेडमधील कॅनल रोडवरील रेड ओक स्पा सेंटरकवर वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अवैध स्पा सेंटरवर छापा टाकला. सर्वात आधी स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील प्रकार सुरू असल्याचा संशय पोलिसांना आला होता. पोलिसांनी छापा टाकला असता वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं निर्दशनास आले.

Nanded Crime
कोथरूड प्रकरण तापलं; रोहित पवार आक्रमक, पोलिसांवर ताशेरे ओढले, Atrocity अंतर्गत गुन्ह्याची मागणी

या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भाग्यनगर पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड या आरोपींना अटक केली. तर, स्पा सेंटरचे मालक अमोदसिंग साबळे, मॅनेजर मनोज जांगिड हे दोघे फरार आहेत.

Nanded Crime
किती पोरांसोबत झोपलीस, रांxxx आहेस की... कोथरूड पोलिसांवर तरूणींच्या छळाचा आरोप

स्पा सेंटरमधून पोलिसांनी चार महिलांची सुटका केली आहे. तसेच पोलिसांनी तपास करीत १६ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या भाग्यनगर पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com