Ladki Bahin Yojana : लाडकीमुळे महाराष्ट्रातील ४ योजना बंद; लाभार्थी शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना बसणार फटका?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेचा फटका आता इतर योजनांना बसत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या इतर ४ योजनांना ब्रेक लागला आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांना फटका बसत आहे

  • लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण वाढतोय

  • ४ योजना बंद होण्याच्या मार्गावर

लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली झालेले घोटाळे समोर आले आहेत. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण वाढत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक विभागांचे निधी वळवले आहेत. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेमुळे ४ सरकारी योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जवळपास अडीच कोटी महिलांना हे पैसे दिले जातात. त्यामुळे दर महिन्याला सरकारी तिजोरीवर भार वाढत आहेत. याचेच पडसाद आता पाहायला मिळत आहे. या योजनेमुळे इतर योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

लाडकी बहीण योजनेमुळे ४ योजनांना ब्रेक (These 4 scheme stop due to ladki bahin yojana)

लाडकी बहीण योजनेमुळे ४ योजनांना ब्रेक लागणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत वित्त विभागाने माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. ही योजना सुरुदेखील झाली. याचसोबत अनेक योजनादेखील सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी १.३६ लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्राकडून घेण्यात आले होते.मात्र, आता राज्याच्या तिजोरीवर ताण वाढत आहेत. त्यामुळेच १०पैकी चार योजनांना ब्रेक लावला आहे.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांचीही नोंदणी थांबवण्यात आली आहे. याचसोबत या तरुणांना जून आणि जुलैचे विद्यावेतन मिळाले नसल्याचेही समोर आले आहे. यामुळे ४ योजनांना ब्रेक लागला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडकीला मिळतात फक्त ५०० रुपये; बहि‍णींचे ₹१००० का कापले?

या ४ योजना बंद (Thesw 4 Schemes Will Discountinue)

  • मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

  • मुख्यमंत्री वयोश्री योजना

  • १ रुपयात पीक विमा

  • मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना

या चारही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे, याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा निधी वापरला जात आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढत आहे. यामुळे या ४ योजना बंद केल्या आहेत, असं सांगितलं जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
Q

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण वाढतोय का?

A

हो, लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा निधी वापरला जातो. त्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण वाढत आहे.

Q

लाडकी बहीण योजनेचा परिणाम इतर योजनांवर होतो का?

A

लाडकी बहीण योजनेमुळे अनेक विभागांचा निधी वळवण्यात आला आहे. त्यामुळे त्या विभागाच्या कामांवर परिणाम होतो. याचसोबत ४ योजनांना ब्रेक लागला आहे.

Q

कोणत्या ४ योजना बंद होणार?

A

लाडकी बहीण योजनेमुळ वयोश्री योजना, अन्नपूर्णा योजना,तीर्थदर्शन योजना आणि १ रुपयात पीक विमा योजना बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com