Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ६० लाख महिलांचे ₹१५०० कायमचे बंद; वाचा अपडेट

Ladki Bahin Yojana 60 Lakh Women Ineligible: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून ६० लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. निकषात न बसणाऱ्या आणि केवायसी न केलेल्या महिलांचा यामध्ये समावेश आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी

६० लाख महिला अपात्र होण्याची शक्यता

अर्थसंकल्पात २६ हजार कोटींचा निधी मंजुर

राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या योजनेतून जवळपास ६० लाखांपेक्षा जास्त महिला कमी होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेसाठी २६ हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यावरुनच लाखो महिलांची नावे वगळण्यात आल्याचे दिसत आहे.

अर्थसंकल्पासाठी निधी मंजूर

यंदाच्या अर्थसंकल्पात २१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सामाजिक न्याय व आदिवासी विभागाकडून ६ हजार कोटी आणि ऐनवेळी मागणीतून ८ ते ९ हजार कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.

लाडकी बहीण योजनेचा भार इतर विभागांवर पडला आहे. राज्यातील कंत्राटदारांचे ७४ हजार कोटी रुपये थकले आहेत. त्यातच आता महिला व बालविकास विभागासाठी २५ हजार ६०० कोटी रुपये दिले आहेत. यात लाडकी बहीण योजनेसाठी २१ हजार कोटी राखीव आहेत.

सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत २ कोटी ४७ लाखांपर्यंत लाभार्थ्यांची संख्या पोहचली होती. दरम्यान, यातून निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांना वगळण्यात आले. ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला आहे. यासोबतच अनेक पुरुष लाभार्थ्यांनीही योजनेचा लाभ घेतला होता. त्यांनाही पैसे मिळणार नाही. याचसोबत लाखो महिलांनी केवायसी केली नाही त्यांचे अर्ज बाद केले आहे.

अनेक महिलांनी केवायसीमध्ये चुका केल्या आहेत. त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.तोपर्यंत महिलांनी केवायसी केली तरच त्यांचा लाभ सुरु राहणार आहे.

६० लाख महिला अपात्र ठरणार? (Ladki Bahin Yojana 60 Lakh Women May Ineligible)

केवायसीमध्ये शिल्लक लाभार्थ्यांची संख्या २४ लाखांपर्यंत आहे. याआधीच ४५ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यानंतर केवायसी पडताळणीत २४ लाखांपैकी १५ लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यामुळेच एकूण ५० ते ६० लाख महिला अपात्र ठरु शकतात. यामुळे फक्त २ कोटींपर्यंत महिला लाभार्थी असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : उद्यापासून यवतमाळ जिल्ह्यात जनगणनेला सुरुवात

Mumbai Goa Highway : कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट! मुंबई गोवा महामार्ग ९० टक्के पूर्ण, फक्त या ठिकाणाचे काम सुरू

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

Short Hair Styling Tips: छोट्या केसांसाठी सोप्या आणि हटके 5 हेअरस्टाईल

IPL 2026 Playoff Scenario: ...तरच मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाणार!

SCROLL FOR NEXT