Ladki Bahin Yojana news Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एप्रिल-मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार, खात्यात एकदम ₹३००० येणार?

Ladki Bahin Yojana April-May Installment: लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. आता मे महिन्यात एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहे.एप्रिल महिना संपण्याआधी पैसे दिले जातील, असं सांगितलं होतं. मात्र, एप्रिल महिना संपला तरीही या योजनेचा हप्ता दिलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्तादेखील कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेत एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला देणार याबाबत आदिती तटकरे लवकरच घोषणा करतील. मार्च महिन्यात जसं फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता दिला गेला होता. तसाच हप्ता आता मे महिन्यातदेखील दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एप्रिल-मे महिन्याचे ३००० रुपये एकत्र येणार?

एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकाच महिन्यात येणार हे नक्की आहे. परंतु हा हप्ता एकत्र येणार की वेगवेगळ्या दिवशी याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.परंतु लवकरच हे पैसे दिले जातील. त्यामुळे मे महिन्याकडे लाडक्या बहिणी आशेने पाहत आहेत. आता लाडक्या बहि‍णींना मे महिन्यात ३००० रुपये मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अक्षय्य तृतीयेचा मूहूर्त चुकला

लाडकी बहीण योजनेत महिनाअखेरपर्यंत पैसे दिले जातील, असंं सांगितलं जात होतं. ३० एप्रिलला अक्षय्य तृतीया होती. त्या दिवशी पैसे मिळतील, अशी आशा लाडक्या बहिणींना होती. मात्र, आता अक्षय्य तृतीयेचा मूहूर्त चुकला आहे. मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: तिशीत Single आहात? परफेक्ट पार्टनर शोधताय? मग 'या' सिक्रेट टिप्स ठरतील फायदेशीर

Winter Ear Care Tips: थंडीच्या दिवसात कानांची काळजी कशी घ्यावी?

Sinnar Bus Stand Accident: एसटी बस थेट स्थानकात असलेल्या प्रवाशांच्या गर्दीत घुसली; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

PMचा PA बनायचंय? कशी होते पर्सनल सेक्रेटरीची निवड, किती असतो पगार?

Maharashtra Live News Update: बदलापुरात शिंदेसेनेचा कॉंग्रेसला दणका

SCROLL FOR NEXT