Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरूवात झाली.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
मात्र या योजनेअंतर्गत इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ५०० रूपये दिले जात आहेत.
महिलांना पीएम किसाना योजना आणि नमो शेतकरी या योजनेअंतर्गत १००० रूपये मिळत आहे.
उर्वरित ५०० रूपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
येत्या दोन दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे येण्याची माहिती आहे.