Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: धक्कादायक आकडेवारी! तब्बल १ कोटी लाडक्या बहिणी अपात्र, राज्य सरकारकडून नव्या निधीची तरतूद, वाचा महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana 1 Crore Women Ineligible: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून एकूण १ कोटी ५ लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी

एकूण १ कोटी लाभार्थी अपात्र होणार

निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजना सुरु होऊन जवळपास २ वर्ष झाली आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा सुरुवातीला एकूण २ कोटी ५३ लाभार्थी होते. यानंतर अनेक महिलांचे लाभ बंद केले आहेत. अनेक महिला अपात्र ठरल्या तर काहींनी केवायसी केली नाही.

१ कोटी लाडक्या बहिणी अपात्र (Ladki Bahin Yojana 1 Crore Women Ineligible)

लाडकी बहीण योजनेत फक्त निकषांमध्ये बसणाऱ्याच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. आता निकषांमध्ये बसणाऱ्याच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता निकषांच्या आधारे झालेल्या पडताळणीत जवळपास १ कोटी पाच लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला २ कोटी ५३ लाख महिलांना लाभ मिळत होता.आता ही संख्या फार कमी झाली आहे. भविष्यात लाभार्थी महिलांची संख्या अजून कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवायसी न केलेल्या तसेच केवायसीमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांचा आकडा वाढू शकतो. जवळपास एकूण १ कोटी महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने निधी मंजुर केला आहे. २६,५०० कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? (Ladki Bahin Yojana Eligibility Criteria)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ यामध्येच असावे. महिलांच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन नसावे. एका कुटुंबातील दोन महिलाच योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच कुटुंबातील कोणीही कर भरत नसावा

सुरुवातीला फक्त काही कागदपत्रांद्वारे अर्ज दाखल केले जात होते. त्यानंतर महिलांचे अडीच लाख उत्पन्न असेल तर त्यांना बाद केले. २०२४ पासून होत असलेल्या पडताळणी १ कोटी ५ लाख महिला अपात्र ठरतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT