Jan Dhan Yojana Saam Tv
बिझनेस

Jan Dhan Yojana: तब्बल ५६ कोटी 'जन धन' खात्याची केवायसी होणार, डेलाईनही ठरली, तुमचं अकाऊंट तर नाही ना? वाचा

Jan Dhan Yojana KYC Mandatory: जन धन योजनेतील खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला जन धन खात्यांची केवायसी करावी लागणार आहे.

Siddhi Hande

जन धन योजनेच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी

जन धन खातेधारकांची केवायसी होणार

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली माहिती

केंद्र सरकारची जन धन योजना ही खूप लोकप्रिय आहे. या योजनेत कोट्यवधी नागरिकांनी अकाउंट ओपन केले आहेत. जन धन योजनेअंतर्गत नागरिकांना आर्थिक व्यव्हार करण्यासाठी अधिक सक्षम केले जाते. त्यांचे व्यव्हार अधिक सुरक्षित व्हावे, यासाठी जन धन अकाउंट सुरु करण्यात आले.

पंतप्रधान जन धन योजनेची दशकपूर्ती

पंतप्रधान जन धन योजनेला १० वर्षे पूर्ण होणार आहेत. याचमुळे या योजनेत खातेधरकांची पुन्हा केवायसी केली जाणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. ही प्रोसेस ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, असं आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका या १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत जन धन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा केवायसी करण्यासाठीकेवायसी शिबिरे आयोजित करत आहे, असंही त्यांनी सांगितले.

ग्राहकांच्या घरोघरी सेवा देण्यासाठी बँका पंचायत स्तरावर शिबिरे राबवत आहेत. यामध्ये नवीन खाते उघडणे, केवायसी करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण याबाबत या शिबिरांमध्ये कामे केली जातील. तसेच सूक्ष्म विमा आणि पेन्शन योजनांवर लक्ष देतील, असंही त्यांनी सांगितले.

आतापर्यंत जवळपास ५५.९० कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी जन-धन अकाउंट उघडले आहेत. या सर्व नागरिकांना केवायसी करणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारने आर्थिक गोष्टी आणि मुलभूत बँकिंग सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उपक्रम हाती घेतले आहेत.

जन-धन योजना काय आहे? (Jan-Dhan Yojana)

जन धन योजना २०१४ साली सुरु झाली होती. या योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहे. या योजनेमुळे गावा-खेड्यातील प्रत्येक व्यक्तीला बँकिंग सेवांचा लाभ कसा घ्यायचा हे समजले. या योजनेअंतर्गत त्यांना खाती उघडून देण्यात आली आहेत. खाते उघडल्यानंतर त्यात सरकारी योजनांचे पैसे जमा होतात. अल्प बचत योजना, कर्ज हे सर्व पैसे जमा केले जातात. यासाठी नागरिकांना मोफत रुपे कार्डदेखील देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : रक्षकच भक्षक! आईच्या डोळ्यासमोर मुलीवर बलात्कार, २ पोलिसांचा काळा कारनामा, राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

Amravati Crime : अमरावतीत फ्लॅटमध्ये सुरु होता देहविक्रचा व्यवसाय; बनावट ग्राहक पाठवून पर्दाफाश, महिलेसह पाच तरुणी ताब्यात

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

SCROLL FOR NEXT