विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना LIC एजंट म्हणून काम करताना पहिल्या वर्षी महिन्याला ₹7000 मानधन मिळते.
दुसऱ्या वर्षी ₹6000 आणि तिसऱ्या वर्षी कामगिरीनुसार भत्ता दिला जातो.
योजनेसाठी महिलांचं वय 18 ते 70 दरम्यान असणं आणि दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
LIC Vima Sakhi Scheme : भारतीय जीवन विमा अर्थात एलआयसीने देशभरातील महिलांसाठी खास योजना आणली आहे. त्याअंतर्गत प्रत्येक महिन्याला सात हजार रूपयांचे मानध दिले जातेय. त्यासाठी महिलांना एक रूपयाही देण्याची गरज नाही. देशभरातील महिलांसाठी एलआयसीने विमा सखी योजना लाँच केली आहे. महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, आणि विमा योजना कानाकोपऱ्यात पोहचवणं, हा त्यामागील उद्देश आहे. एलआयसी विमा प्रतिनिधी झाल्यास महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये खात्यात खटाखट जमा होणार आहेत. (LIC Vima Sakhi Scheme for women to earn ₹7000 monthly)
महिला सशक्तीकरणासाठी एलआयसीने विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसी प्रतिनिधी होण्याची सधी दिल जाते. या योजनेसोबत जोडलं गेल्यास एलआयसीकडू त्या महिलांना तात्काळ ट्रेनिंग दिले जात. त्यानंतर जॉयनिंगनंतर महिला प्रतिनिधींना प्रत्येक महिन्याला सात हजार रूपयांचा भत्ता दिला जातो. महिलांमध्ये एलआयसी योजनेचा प्रसार करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
विमा सखी योजनेच्या अतंर्गत महिला प्रतिधिनींना कामगिरीच्या आधारावर पहिल्या तीन वर्षांत महिन्याला पगार दिला जातो. अधिकृत संकेतस्थळानुसार, महिलांना प्रत्येक महिन्यााल सात हजार रुपये एलआयसीकडून दिले जातात. दुसऱ्या वर्षाला महिन्याला सहा हजार रूपयांचे मानधन मिळते. पण पहिल्या वर्षी सुरू केलेल्या एलआयसी पॉलिसीमधील ६५ टक्के कार्यरत असावेत.
सेल्फ अटेस्टेड वय अधिवास प्रमाणपत्र
रहिवाशी प्रमाणपत्र
शैक्षणिक प्रमाणपत्र, सेल्फ अटेस्टड
अर्जसह पासपार्ट साईजचा फोटो
या योजनेचा लाभ कुणाला घेता येत नाही?
आधीच एलआयसी एजंट अथवा कर्मचारी असेल तर या योजनेचा लाभ घेता येत नाही. घरातील इतर कोण एलआयसी एजंट असेल तरीही अर्ज करता येत नाही.
एलआयसी कार्यालय अथवा संकेतस्थळाद्वारे य योजनेसाठी अर्ज करता येतो. विमा सखी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिला, तरूणीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि ७० वर्षांपेक्षा कमी असावे. अर्जदार कमीत कमी दहावी पास असावा.
विमा सखी योजना म्हणजे नेमकं काय?
एलआयसीने सुरू केलेली ही योजना महिलांना एजंट म्हणून काम करण्याची संधी देते, ज्यांत त्यांना पहिल्या वर्षी महिन्याला ₹7000 मानधन दिलं जातं.
कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो?
अर्ज करणाऱ्या महिलांचं वय 18 ते 70 दरम्यान असावं आणि त्या किमान दहावी उत्तीर्ण असाव्यात. त्या आधीपासून LIC एजंट नसाव्यात.
अर्जासाठी कोणती कागदपत्रं लागतात?
वयाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो आणि अर्ज.
अर्ज कुठे करता येतो?
जवळच्या LIC कार्यालयात किंवा LIC च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.