ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: ITR भरताना 'या' चुका अजिबात करू नका, अन्यथा भरावा लागू शकतो मोठा दंड

ITR Filling Deadline: आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटची तारीख ३१ जुलै आहे. त्याआधी करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे. आयटीआर फाइल करताना योग्य माहिती भरावी. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

Siddhi Hande

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहे. ३१ जुलै ही आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही ३१ जुलैआधी अर्ज केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. आयटीआर फाइल करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करदात्यांकडून केली जात आहे. मात्र, याबाबत प्राप्तिकर विभागाने कोणतीही मिहीती दिली नाही.आयटीआर फाइल करताना नेहमी खरी माहिती भरावी. जर तुम्ही कर वाचवण्यासाठी चुकीची माहिती भरली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना तुम्ही कर वाचवण्यासाठी चुकीचे क्लेम करु नका. अन्यथा प्राप्तिकर विभाग तुमच्यावर कारवाई करु शकतात. जर तुम्ही तुमचे उत्पन्नदेखील कमी दाखवले तरीही तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही आयटीआर फाइल करताना चुकीची माहिती भरली तर तुमचा रिफंड येण्यासाठी वेळ लागतो.

याबाबत प्राप्तिकर विभागाने माहिती दिली आहे. प्राप्तिकर विभागाने म्हटलंय की, कृपया आयटीआरमध्ये चुकीची माहिती भरु नका. तुमचे उत्त्पन्न कमी करुन सांगू नका.हा एक दंडनीय गुन्हा आहे. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुम्हाला कर रक्कमेच्या १०० के ३०० टक्के दंड भरावा लागू शकतो.

मुदतीनंतर आयटीआर भरल्यास काय होते

तुम्हाला ३१ जुलै २०२४ पर्यंतच आयटीआर भरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही आयटीआर भरण्यास उशीर केला तर तुम्हाला १००० ते १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे सांगितले तर तुम्हाला ५० टक्के दंड भरावा लागेल. जर तुमच्याकडून चुकून आयटीआर भरताना चुकीची माहिती भरली गेली असेल तर तुम्ही त्यात बदल करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

Maharashtra Government: सरकारच्या तिजोरीवर लोकप्रिय योजनांचा ताण; महाराष्ट्राच्या डोक्यावर ९ लाख कोटींचं कर्ज

SCROLL FOR NEXT