ITR Filling News Google
बिझनेस

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै? वाचा कधीपर्यंत भरता येणार

ITR Filling Last Date: आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय असा प्रश्न अनेक करदात्यांना पडलेला आहे.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही आयटीआर भरु शकतात. आतापर्यंत अनेक करदात्यांनी आयटीआर फाइल केले आहेत. जवळपास १ कोटींपेक्षा अधिक लोकांनी आयटीआर फाइल केले असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आयटीआर फॉर्म १ ते आयटीआर फॉर्म ४ भरला जात आहे.

दरम्यान, आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय असा प्रश्न करदात्यांना पडलेला आहे. यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

आयटीआर फाइल करायची शेवटची तारीख कोणती? (ITR Filling Deadline)

करदात्यांना यावर्षी मोठा दिलासा मिळाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. मागील वर्षी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. यंदा ही तारीख वाढवून १४ सप्टेंबर २०२५ करण्यात आली आहे. हे फक्त इंडिविड्युअल करदात्यांसाठी आहे. ज्यांच्या अकाउंटच्या ऑडिट करण्याची गरज नाही त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करता येणार आहे.

मुदतीपूर्वी आयटीआर भरला नाही तर (What Happen If We Wont File ITR Before Deadline)

जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. याचसोबत तुम्हाला दर महिन्याला १ टक्के व्याजदरदेखील भरावे लागणार आहे. ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. जर ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना ५००० रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी आयटीआर भरण्यास सांगितले जात आहे. जर तुम्ही आयटीआर वेळेवर भरला नाही तर तुम्हाला बिलेटेड आयटीआर फाइल करता येणार आहे. परंतु यासाठी दंड भरावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT