Income Tax Return: आता आयटीआर फाइल केल्यावर रिफंड कधी मिळणार? वाचा सविस्तर

ITR Refund: आतापर्यंत अनेक करदात्यांनी आयटीआर फाइल केले आहेत. आयटीआर फाइल केल्यानंतर रिफंड कधी मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Income Tax Refund
Income Tax RefundSaam Tv
Published On

आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन यावर्षी वाढवून देण्यात आली आहे. तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. आयटीआर फाइल केल्यानंतर त्याचा रिफडं लवकरच तुमच्या खात्यात जमा केला जाईल. रिफंड थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जाईल.

याबाबत आयकर विभागाने अजून कणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु तुम्ही जेवढ्या लवकर आयटीआर फाइल करणार तेवढे तुमच्यासाठी फायद्याचे असते.

Income Tax Refund
Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

जर तुम्ही डेडलाइन आधी आयटीआर (ITR) फाइल केला आणि जर चुकून रिटर्न फाइल करताना काही चुक झाली तर त्याची प्रोसेसिंग लवकर केली जाईल. त्यानंतर तुमच्या खात्यात रिफंड जमा होईल. एक्सपर्टच्या मते, मे आणि जून महिन्यात रिटर्न डेटा मॅच केला जातो. त्यानंतर आयटीआर फाइल केला जातो. यानंतर २ ४ आठवड्यांमध्ये प्रोसेसिंग होते. जे करदाते एकदम मुदत संपायच्या वेळी आयटीआर फाइल करतात त्यांच्या रिटर्न प्रोसेसिंगमध्ये खूप वेळ लागतो.

आयटीआर फाइल करताना चुका करू नका (Avoid These Mistakes While File ITR)

आयटीआर लवकर फाइल केल्यावर त्याची प्रोसेसिंग लवकर होते. परंतु आयटीआर फाइस करताना कोणतीही चुकी करु नका, जर तुम्ही फॉर्म 26AS मधील माहिती चुकीची लिहली तर अनेक अडचणी येऊ शकतात. इन्कम टॅक्स विभाग रिव्ह्यू साठी सिलेक्ट करु शकतात. यामुळे रिफंड येण्यासाठी ६०-९० दिवस उशीर होऊ शकतो.

Income Tax Refund
ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

रिटर्नची प्रोसेस

इन्कम टॅक्स विभाग आयटीआर व्हेरिफिकेशन झाल्यावरच रिफंडची प्रोसेस सुरु करतात. त्यामुळे प्रोसेसिंगचा वेळ प्रत्येक करदात्यासाठी वेगवेगळा असतो. आटीआर फाइल केल्यानंतर रिटर्नमध्ये जर कोणताही डेटा मॅच झाला नाही तर नोटिस येऊ शकते. त्यामध्ये खूप वेळ जाईल. त्यामुळे आयटीआर फाइल करताना व्यवस्थित भरावा.

Income Tax Refund
ITR Filling 2025: बायकोला रोख रक्कम देताय, कापला जाईल टॅक्स, आयकर नियम काय सांगतात? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com