ITR Filling 2025: तुमच्या उत्पन्नानुसार निवडा आयटीआर फॉर्म! कोणासाठी कोणता फॉर्म योग्य? वाचा सविस्तर

ITR Filling 2025 Forms: आयटीआर फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार आयटीआर फाइल करावा लागतो. तुमच्या उत्पन्नासाठी कोणता फॉर्म योग्य आहे याबाबत माहिती देणार आहोत.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On

पगारदार वर्गाने आयटीआर फाइल करण्यास सुरुवात केली आहे. आयटीआर फाइल करताना योग्य फॉर्म निवडणे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही चुकीचा आयटीआर फॉर्म निवडला तर तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात. आयटीआर फॉर्म हा उत्पन्नानुसार निवडायचा असते. पगारदार वर्ग, बिझनेसमॅन अशा सर्व उत्पन्नासाठी वेगवेगळा आयटीआर फॉर्म असतो.

ITR Filling
ITR Filling 2025: आयटीआर फाइल करण्याची योग्य वेळ कोणती? या तारखेनंतरच भरा; अन्यथा रिफंड येण्यास येतील अडचणी

आयटीआर १ सहज (ITR 1)

जर तुमचे उत्पन्न (Income) ५० लाख एवढे असेल तर तुम्हाला आयटीआर १ भरावा लागणार आहे. हे उत्पन्न सॅलरी किंवा पेन्शनमधून येत असावे. याचसोबत १ रुमचे घरभाड्यांचा समावेश आहे. जर शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये नफा १ लाख २५ हजार असेल तर त्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.

जर उत्पन्न जास्त असेल किंवा एकापेक्षा जास्त घरातून भाडे मिळत असेल. शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये नफा किंवा तोटा झाला असेल तर आयटीआर १ भरता येता नाही.

आयटीआर २ (ITR 2)

बिझनेस, धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्यांना आयटीआर २ भरावा लागणार आहे. जर तुम्हाला धंदा करताना नफा नसेल तरच आयटीआर २ फाइल करता येणार आहे.

आयटीआर ३ (ITR 3)

जर तुम्हाला धंदा किंवा व्यवसायामध्ये नफा मिळाला असेल तर आयटीआर ३ भरावा लागेल.त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार फॉर्म भरा.

ITR Filling
ITR Filling 2025: वेळ आणि पैसे दोन्ही वाचवा, CA शिवाय घरबसल्या फाइल करा ITR, सोपी प्रोसेस वाचा

आयटीआरच्या नियमांत बदल

याआधी जर तुमचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असेल तर मालमत्ता आणि कर्ज याची यादी आयटीआरमध्ये भरावी लागायची. मात्र, आता फक्त १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर यादी द्यावी लागणार आहे.

आतापर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आणि १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी फॉर्म उपलब्ध झालेले नाही. याचे फॉर्म लवकरच उपलब्ध केले जातील.

ITR Filling
Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com