income tax return errors google
बिझनेस

ITR Filing Mistakes: आयटीआर फाइल करताना 'या' चुका कधीच करु नका, अन्यथा भरावा लागेल दंड

ITR Filling: आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लाखो करदाते आपले रिटर्न भरायला सुरुवात करत आहेत.

Sakshi Sunil Jadhav

आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस सुरु झाली की करदातेही घाईत रिटर्न भरायला सुरुवात करतात. मात्र फक्त सॅलरी स्लिप आणि १६ नंबर फॉर्मच्या ( Form 16 ) आधारावर ITR भरणं चुकीचं ठरू शकतं. म्हणजेच तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

कर (Tax) तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी मोठ्या संख्येने लोक ITR-1 आणि ITR-2 यामध्ये चूक करतात. त्यामुळे त्यांना भविष्यात नोटीस, रिफंड अडकण्याची किंवा दंड भरण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे चुकीचा आयटीआर फॉर्म, उप्तन्नाची अपूर्ण माहिती किंवा ई-व्हेरिफिकेशन न करणे अशा चूका करणं आत्ताच टाळा. तसेच ITR-1 आणि ITR-2 मधला फरक नीट समजून घ्या. नाहीतर तुम्हाला भविष्यात आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं.

ITR-1 आणि ITR-2 मधील फरक काय आहे?

ज्याचे उत्पन्न हे ५० लाखांपर्यंत आहे त्यांना ITR-1 लागू होतो. तसेच यामध्ये वेतन, पेन्शन, दोन घरांच्या मालमत्तेचं उत्पन्न किंवा व्याजाच्या स्वरुपातली कमाई असलेल्या निवासी व्यक्तींनाही ITR-1 लागू होतो. नव्या नियमांनुसार कलम 112A अंतर्गत 1.25 लाख रुपयांपर्यंतचा दीर्घकालीन भांडवली नफा (Long Term Capital Gain) असलेल्या व्यक्तींनाही काही अटींसह ITR-1 भरता येईल.

तर ज्यांची परदेशातली मालमत्ता, परदेशी उत्पन्न, अनेक घरं, कंपनीतली मोठी पदं, अनलिस्टेड शेअर्स किंवा शेअर बाजारात भांडवली नफा असेल तर ITR-2 भरणं महत्वाचे आहे.

ITR भरताना कोणत्या चुका करणे टाळावे?

सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीचा फॉर्म निवडू नका. तसेच AIS, TIS आणि Form 26AS यामधली माहिती नीट पाहा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण यामधील माहिती आणि आयटीआरमधला तपशील जुळला नाही तर आयकर विभागाकडून स्पष्टीकरण मागवलं जाऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT