वाराणसी : (IPS Aditi Upadhyay Success Story) भारतात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणे खूप अवघड आहे. एमबीबीएस आणि बीडीएस हे दोन्ही अभ्यासक्रम देशातील सर्वात कठीण अभ्यासक्रम आहेत. आपल्याकडे अनेक सरकारी अधिकाऱ्यांची उदाहरणे आहेत ज्यांनी डॉक्टरकीसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि त्यात यश मिळवले. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी डॉ. अदिती उपाध्याय यांचेही नाव या यादीत समाविष्ट आहे. त्या दिवसा वैद्यकिय सेवा द्यायच्या आणि रात्री UPSC परीक्षेची तयारी करायच्या.
डॉ. अदिती उपाध्याय यांचा संघर्ष खरचं प्रेरणादायी आहे. देशातील लाखो तरुणांसाठी त्या आदर्श बनल्या आहेत. त्यांनी प्रथम आपले करियर स्थिर केले आणि नंतर UPSC CSE ची तयारी सुरू केली, जी देशातील आणि जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यातही त्यांनी अथक परिश्रम करून यशाची पताका फडकवली. डॉ. अदिती उपाध्याय 2023 मध्ये झालेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून दंतचिकित्सकातून IPS अधिकारी बनली.
शालेय शिक्षणानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाची तयारी सुरू केली
आदिती उपाध्याय या मूळच्या वाराणसी म्हणजेच उत्तर प्रदेशातील काशीच्या आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण येथूनच झाले. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. अदिती उपाध्यायने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मेडिकल आणि डेंटलमध्ये करिअर करण्यासाठी आदितीने बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या IMS अर्थात BHU च्या BDS कोर्समध्ये प्रवेश घेतला.
डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले
अदिती उपाध्याय बीएचयू आयएमएसमधून दंत शस्त्रक्रियेतील पदवी म्हणजेच बीडीएस पदवी प्राप्त केल्यानंतर डॉक्टर बनली. डॉ. अदिती उपाध्याय सांगतात की, तिचे आजोबा तिला लहानपणी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास प्रवृत्त करायचे. पण त्यांनी आधी वैद्यकशास्त्रात करिअर करायचं ठरवलं. पुन्हा एकदा रुग्णालयातील गैरसोयी पाहून नागरी सेवेत रुजू होण्याचा विचार त्यांच्या मनात आला. सरकारी अधिकारी होऊनच ही परिस्थिती सुधारू शकते हे त्यांना समजले होते.
शिकवणी न लावता मिळविले यश
डॉक्टरची जबाबदारी पार पाडत अदितीने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी त्यांनी कधीही ऑफलाइन कोचिंग केले नाही. त्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून रात्री अभ्यास करायच्या. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांनी प्रॅक्टीस सोडली आणि मुलाखतीची तयारी सुरू केली. डॉ. अदिती उपाध्याय सांगतात की त्यांनी UPSC मुलाखतीला येण्यापूर्वी हनुमान चालीसा वाचली होती. त्या UPSC परीक्षेत 127 व्या क्रमांकाने आयपीएस अधिकारी बनल्या.
Edited By- नितीश गाडगे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.