Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टात २ लाख रुपये गुंतवा अन् ६ लाख मिळवा, कसं काय? घ्या जाणून

Post Office: पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही २ लाख रुपयांची गुंतवणूक करा तुम्हाला ६ लाखांचा परतावा मिळेल. काय आहे ही योजना घ्या जाणून...

Priya More

प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणूक करून चांगला नफा मिळवायचा असतो. पण बऱ्याचदा अनेक जण कोणत्या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करायची? किंवा कुठे गुंतवणूक करून जास्त नफा मिळवावा याबद्दल गोंधळलेले असतात. अनेकदा तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. तर बरेच लोक पैसे दुप्पट करण्याच्या नादात स्वतःकडे असलेली रक्कम गमावून बसतात. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची गुंतवणूक नेहमी फायद्याची ठरते. तुम्हांलाही तुमच्या २ लाख रुपयांचे ६ लाख रुपये करायचेत मग ही पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला मालामाल बनवेल. काय आहे ही योजना घ्या जाणून...

पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला फायद्याचे ठरू शकते. या एफडीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. व्याजदर देखील कालावधीनुसार बदलतात. जर तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला ७.५ टक्के व्याजदराने परतावा मिळेल. जर तुम्ही त्यात ७ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १०,१४,९६४ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला एकूण ३,१४,९६४ रुपये नफा मिळेल.

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना ५ वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर ७.५ टक्के व्याजदराने परतावा देते. तुम्ही गुंतवलेली रक्कम तीन पट करण्यासाठी तुम्हाला ही एफडी दोन वेळा वाढवावी लागेल. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल असेल की, जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,८९,९९० रुपये मिळतील. तुम्ही ही एफडी ५ वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ४,२०,४७० रुपये मिळतील.

त्यांनतर पुन्हा ही एफडी पुढील ५ वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ६,०९,३७० रुपये मिळतील. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर ६ लाख रुपयांच्या पूर्ण रकमेत करू शकता. यासाठी तुम्हाला १५ वर्षांचा कालावधी द्यावा लागेल. पोस्टाची ही योजना तुम्हाला मालामाल बनवेल. याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

Jio Cheapest Plan: जिओने आणला जबरदस्त प्लॅन, ११ महिने सिम बंद होणार नाही; जाणून घ्या किंमत किती?

Hans Rajyog Diwali 2025: दिवाळीपासून 'या' राशींची धनाने भरणार झोळी; सोन्या-चांदीच्या नाण्यांचा होणार पाऊस

Pakistan : एअरस्ट्राइकला तालिबानचं प्रत्युत्तर! पाकिस्तानच्या ५ प्रांतावर हल्ला, १२ सौनिकांचा मृत्यू, अनेक चौक्यांवर कब्जा

Accident : आयटीआयसमोर भीषण अपघात, स्पीड ब्रेकरवर वाहन आदळलं अन् दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT