Post Office Scheme: पोस्टाची लहान मुलांसाठी जबरदस्त योजना! विमा कव्हरसोबतच बोनसदेखील मिळेल, फायदाच फायदा होणार

Post Office Child Insurance Scheme: पोस्ट ऑफिसची लहान मुलांसाठी खास विमा योजना आहे. या योजनेत तुम्हाला विमा कव्हरसोबतच बोनसदेखील मिळतो.
Post Office Scheme
Post Office SchemeSaam Tv
Published On

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करतात. मुलांचे भविष्यासाठी पैसे गुंतवणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना खूप फायद्याची आहे. पोस्ट ऑफिस बाल जीवन विमा (Post Office Child Insurance Scheme)योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला खूप फायदा होईल.

Post Office Scheme
SBI SIP Scheme: महिन्याला २५० गुंतवा अन् १७ लाख रुपये मिळवा; SBIच्या एसआयपीने व्हाल मालामाल

मुलांच्या भविष्यासाठी ही गुंतवणूक करा.पोस्ट ऑफिस बाल जीवन विमा ही विमा योजना आहे. पोस्टल लाइफ इन्श्युरन्सद्वारे ही योजना चालवली जाते. यामध्ये तुम्हाला लाइफ इन्श्युरन्स कव्हरसह मॅच्युरिटीवर ३ लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम मिळते. यामध्ये बोनसदेखील मिळतो.

चाइल्ड लाइफ इन्शुरन्स योजनेत पोस्ट लाइफ इन्श्युरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्श्युरन्स अंतर्गत स्वतंत्र विमा दिला जातो. पीएलआयअंतर्गत ३ लाख तर आरपीएलआयअंतर्गत १ लाखांपर्यंतचा विमा दिला जातो. तसेच दोघांचा प्रिमियमदेखील वेगळा असतो.

रुरल पोस्ट लाइफ इन्श्युरन्सअंतर्दत तुम्हाला १००० रुपयांच्या विम्यावर ४८ रुपयांचा बोनस दिला जातो. तर पोस्टल लाइफ इन्शुरन्सअंतर्गत ५२ रुपयांचा विमा दिला जातो.

पोस्ट ऑफिस बाल विमा योजनेत तुम्ही दोन मुलांचा विमा मिळवू शकतात. यामध्ये ५ ते २० वर्षांच्या मुलांचा विमा खरेदी करता येतो. जे पालक विमा खरेदी करतील त्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Post Office Scheme
eNAM Scheme: सब्सिडीत बळीराजाची नाही होणार फसवणूक; शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारचा मोठा निर्णय

तुम्हाला या पॉलिसीमध्ये ५ वर्षे नियमित प्रिमियम भरायचे आहे. नियमित प्रिमियम भरल्यावर पेड अप पॉलिसी बनते. जर मुदतीपूर्वी मुलाचा मृत्यू झाला ततर त्याचा प्रिमियम माफ केला जातो. पोस्ट ऑफिस बाल विमा योजनेत तुम्ही मासिक, तीन महिन्याला, सहामाही आणि वार्षिक आधारावर गुंतवणूक करु शकतात. यामध्ये पॉलिसी घेताना मुलांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे नाही.

Post Office Scheme
Post Office RD Scheme: दरमहा 3000 गुंतवणुकीवर 5 वर्षांनंतर किती परतावा मिळेल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com