Shruti Vilas Kadam
पोस्ट ऑफिस RD योजनेचा कालावधी 5 वर्षांचा (60 महिने) असतो. सध्या या योजनेवर 6.7% वार्षिक व्याजदर लागू आहे, जो त्रैमासिक आधारावर कंपाउंड केला जातो.
दरमहा 3000 रुपये जमा केल्यास, 5 वर्षांमध्ये एकूण 1,80,000 गुंतवले जातात. या कालावधीत एकूण व्याज 34,097 मिळते, ज्यामुळे एकूण परतावा ₹2,14,097 होतो.
पोस्ट ऑफिस RD मध्ये व्याज त्रैमासिक कंपाउंडिंग पद्धतीने मोजला जातो, ज्यामुळे गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिस RD कॅल्क्युलेटरच्या मदतीने आपण आपल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याची अचूक गणना करू शकता. यासाठी Groww, Scripbox, INDmoney यांसारख्या वेबसाइट्सवर उपलब्ध असलेल्या कॅल्क्युलेटरचा वापर करता येतो.
RD खाते 3 वर्षांनंतर बंद करता येते, परंतु अशा वेळी व्याजदर कमी लागू होतो. तसेच, 6 महिन्यांचे डिपॉझिट अॅडव्हान्समध्ये भरल्यास सूट मिळते.
पोस्ट ऑफिस RD खात्यात नॉमिनीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते.
RD खात्यावरील व्याजावर TDS लागू होतो. जर वार्षिक व्याज 40,000 पेक्षा जास्त असेल, तर TDS वसूल केला जातो. कर सवलतीसाठी फॉर्म 15G किंवा 15H सादर करता येतो.