IRCTC New Scheme : आपल्यापैकी अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश लोक IRCTC च्या वेबसाइटवरुन त्याचे तिकीट बुक करतात. परंतु अनेकांना IRCTC च्या काही योजनांबद्दल माहित नाही.
IRCTC वरुन तिकीट बुक केल्यानंतर आपल्याला १० लाखांचा विमा संरक्षण मिळते. त्यासाठी आपल्याला फक्त ३५ पैसे खर्च करुन तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळवता येईल.
नुकतेच ओडिशाच्या एक्सप्रेसच्या भीषण अपघातानंतर भारतीय रेल्वेने (Railway) प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. नवीन प्रणालीनुसार, प्रवाशांना आता तिकीट (Ticket) बुक करताच विमा संरक्षण मिळणार आहे. यामध्ये खर्चही खूप कमी असेल.
ट्रेनमध्ये तिकीट बुक करण्यापूर्वी प्रवास विम्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रवाशांना केवळ 35 पैसे भरून 10 लाखांचे विमा (Insurance) संरक्षण मिळू शकते. आतापर्यंत ही व्यवस्था ऐच्छिक होती. मात्र आता रेल्वेने ती आवश्यक केले आहे. म्हणजेच IRCTC वरून तिकीट बुक होताच विमा संरक्षण मिळेल.
1. 35 पैशांत १० लाखांचा विमा संरक्षण
या सुविधेअंतर्गत, रेल्वे अपघात झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. त्याची किंमतही केवळ 35 पैसे आहे. आतापर्यंत या वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाची सुविधा ऐच्छिक होती. प्रवासी त्यांच्या इच्छेनुसार ते निवडायचे. प्रवाशांचे हित लक्षात घेऊन ही सुविधा आता सगळ्यांसाठी करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आता तिकीट बुकिंगच्या वेळी ते निवडण्याची गरज नाही. प्रवाशांना तिकिटासह ही सुविधा आपोआप मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, बालासोर दुर्घटनेत बळी पडलेल्या बहुतेक प्रवाशांनी या सुविधेचा पर्याय निवडला नव्हता. त्यामुळे त्यांना मोठे कव्हर मिळणे अशक्य झाले. अशा परिस्थितीत रेल्वेने आता ही सुविधा सगळ्यांसाठी लागू केली आहे.
2. विम्याचा दावा कसा करावा?
रेल्वे अपघात झाल्यानंतर ४ महिन्यांच्या आत प्रवासी विम्याचा दावा करू शकतात. IRCTC द्वारे प्रदान केलेल्या या सुविधेसाठी, प्रवासी विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन विम्यासाठी दावा दाखल करू शकतात. विमा खरेदी करताना प्रवाशांनी नॉमिनीचे नाव भरणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडल्यास दावा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. प्रवासादरम्यान, जर तुमचा दुर्दैवाने अपघात झाला, तर विमा कंपनीकडून 10 लाख रुपये दिले जातात. मात्र, दाव्याची रक्कम वेगवेगळ्या अपघातांमध्ये प्रवाशांचे किती नुकसान होते यावर अवलंबून असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.