Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Income Tax Refund: सरकारची करदात्यांना खुशखबर! आता लवकर जमा होणार रिफंड

Income Tax Refund Process: करदात्यांसाठी महत्त्वाची बातम आहे. आता लवकरच करदात्यांच्या खात्यात रिफंड जमा होणार आहे. यासाठी NPCI ने नवीन सुविधा सुरु केली आहे.

Siddhi Hande

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता करदात्यांना लवकरात लवकर रिफंड मिळणार आहे. दरवर्षीपेक्षा इन्कम टॅक्स रिफंड करदात्यांच्या अकाउंटला लवकर क्रेडिट होणार आहे. यामुळे करदात्यांना फायदा होणार आहे. जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला रिफंडचे पैसे लवकर मिळणार आहे. आका टॅक्स रिफंड आधीपेक्षा लवकरच प्रोसेस होणार आहे. रिफंड प्रोसेस पूर्ण होण्यासाठी फक्त १५-२० दिवसांचा कालावधी लागत होता. त्यानंतर आता अजून कमी वेळ लागणार आहे. दरम्यान, आता बँक खाते आणि पॅन लिंक असणाऱ्यांसाठी नवीन सुविधा सुरु केली आहे.

NPCI ने सुरु केली नवीन सुविधा

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने इन्कम टॅक्स ई-फायलिंगमध्ये पॅन आणि बँक अकाउंट व्हेरिफिकेशसंबंधित नवीन सुविधा सुरु केली आहे. यासाठी करदत्यांना इन्कम टॅक्स ई फायलिंग वेबसाइटवर पॅन आणि बँक अकाउंट जोडण्याच्या प्रोसेसमध्ये मदत करतील.

NPCI ने त्यांच्या परिपत्राक म्हटलंय की, याचे उद्दिष्ट बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टीमधून पॅन कार्डची माहिती आणि बँक अकाउंटची स्थित आणि अकाउंटधारकाचे रिअल टाइल व्हेरिफिकेशन करणे. याबाबत १७ जून रोजी माहिती दिली होती.

NPCI ने सरकारी विभागांसाठी पॅन कार्ड आणि बँक अकाउंट व्हेरिफिकेशन एपीआय (API) सुरु केले आहे. यामुळे बँकिंग सिस्टीम पॅन कार्ड आणि बँक डिटेल्सचे व्हेरिफिकेशन करेल.

जर ही नवीन सुविधा सुरु झाली तर इन्कम टॅक्स रिफंड आणि डीबीटी प्रोसेस लवकरात लवकर होणार आहे. यामुळे फ्रॉड होण्याची शक्यतादेखील नसणार आहे. यामुळे निर्धारित वेळेपेक्षा आधीच रिफंड मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT