Ayushman Bharat Yojana Saam Tv
बिझनेस

Ayushman Bharat: कोण कोणत्या खासगी रूग्णालयात आयुष्मान कार्डचा वापर, एका क्लिकवर जाणून घ्या

Ayushman Bharat Hospitals List: आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. हे उपचार तुम्ही सरकारी तसेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही घेऊ शकतात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आयुष्मान भारत योजना राबवली आहे. या योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. या योजनेचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिक घेत आहेत. २०१८ मध्ये केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे.

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. त्या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी फक्त सरकारी रुग्णालय नाही तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही उपचार घेऊ शकतात.

आयुष्मान भारत योजनेत तुम्ही कोणत्या रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकता हे घरबसल्या चेक करु शकतात. यासाठी ऑनलाइन सोपी प्रोसेस आहे.

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर pmjay.gov.in जावे लागेल. त्यानंतर तिथे "Find Hospital" या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर राज्य, जिल्हा आणि हॉस्पिटल टाइप करावे लागेल. यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

या योजनेत ज्या आजारावर उपचार घ्यायचा आहे. ते सिलेक्ट करा. त्यानंतर Empanelment Type मध्ये PMJAY सिलेक्ट करायचे आहे. यानंतर कॅप्चा कोड टाकून सर्च ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलची लिस्ट दिसणार आहे. यामध्ये तुम्ही कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात. त्याची माहिती असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT