
७ मार्च रोजी बांगलादेशातील मेहरपूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली, ज्याचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माकड एका मेडिकलमध्ये जखमेसाठी वैद्यकीय मदत मागताना दिसत आहे. फुटेजमध्ये माकड मेडिकलच्या काउंटरवर बसलेला असून, एक माणूस त्याच्या जखमेवर उपचार करत आहे आणि पट्टी बांधत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, हा व्हिडिओ बांगलादेशातील असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना प्राण्यांच्या मदतीच्या संदर्भात चर्चेला कारण ठरली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, जखमी माकड एका स्थानिक परिसरात भटकत होते आणि मदतीसाठी फार्मसीत आलं.
मेडिकलमध्ये त्याला प्राथमिक वैद्यकीय मदत देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्राण्यांच्या मदतीसाठी असलेल्या मानवतेच्या उदाहरणाचे प्रदर्शन करत आहे.सोशल मीडियावर जखमी माकडाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. एका यूजर्सने लिहिले, प्राण्यांची काळजी घेताना लोकांना पाहून आनंद झाला.
तसेट, दुसऱ्या यूजर्सने म्हटले, जर इतर कोणीतरी अशी मदत मागायला आला तर त्याला हाकलून लावतील. तिसऱ्या यूजर्सने तर टिप्पणी केली, माकडाचा बुद्ध्यांक सरकारपेक्षा जास्त आहे. या प्रतिक्रियांमधून लोकांचा प्राण्यांसाठी असलेला सहानुभूतीचा दृष्टिकोन आणि समाजातील दुटप्पी वागणुकीवर प्रश्न उठवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.