सध्या बॅंकांमध्ये पैसे ठेवणे कठीण होऊन बसलयं. आता खाजगी बॅंक खात्यात पैसे जमा करण्यावर काही नियम तयार करण्यात आले आहे. त्यामुळे Hdfc,icic, Axisच्या ग्राहकांना मोठा दणका बसला आहे. नियमांमध्ये ग्राहकांना त्यांच्या खाजगी खात्यात पुर्वीपेक्षा जास्त रक्कम शिल्लक ठेवावी लागणार आहे. पुढे आपण तीन बॅंकांचे नियम जाणून घेणार आहोत.
ICICI बँक
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आयसीआयसीआय बॅंकेने खाजगी खात्यात नवा नियम सुरु केला. त्यामध्ये ग्राहकांच्या बचतीला मोठा फटका बसला. icic बँकेत नवीन खाते उघडणाऱ्या ग्राहकांना आता किमान ५०,००० रुपये किमान शिल्लक ठेवावे लागणार आहेत. ही किम्मत थेट ४०,००० रुपयांनी वाढलेली आहे. पुर्वी ही किम्मत १०,००० रुपये होती. हा नियम देखील १ ऑगस्ट २०२५ पासून लागू करण्यात आला आहे.
HDFC बॅंक
HDFC बॅंकेने आयसीआयसी बॅंकेनंतर शिल्लक रकमेत बदल केला. आणि त्याची मर्यादा शहरी भागांमध्ये पुर्वी कमीतकमी बॅलन्सची मर्यादा १०,००० रुपये होती. मात्र आता वाढवून २५,००० रुपये करण्यात आली आहे. शहरी शाखांमध्ये ही मर्यादा ५,००० रुपयांवरून २५,००० रुपये करण्यात आली आहे. ग्रामीण शाखांमध्ये मिनिमम बॅलन्सची मर्यादा ५,००० रुपयांवरून १०,००० रुपये करण्यात आली आहे. जर तुमच्या खात्यात ही किमान शिल्लक रक्कम नसेल, तर बॅंक तुमच्याकडून दंड आकारु शकते. यामध्ये पगार खाते आणि बेसिक सेविंग बॅंक डिपॉजीट अकाउंट असलेल्या ग्राहकांना या नियमाकून सूट देण्यात आली आहे.
Axis
अॅक्सिस बँक बचत खात्यात तुम्हाला शहरी शाखांमध्ये १२,००० रुपये, अर्धशहरी शाखेत ५,००० रुपये, ग्रामीण शाखेत २,५०० रुपये मिनिमम बॅलन्स असणे आवश्यक आहे. शिवाय लिबर्टी बचत खात्यात २५,००० रुपये, प्रेस्टिज बचत खात्यात ७५,००० रुपये प्रायोरिटी बचत खात्यात २ लाख रुपये रक्कम ठेवावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.