Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडली, UPSC परीक्षा दिली अन् IAS झाली; महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या प्रियंवदा यांची यशोगाथा वाचा

IAS Priyamvada Success Story: आयएएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. असंच स्वप्न प्रियंवदा यांनीही लहानपणी बघितले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी परदेशातील नोकरी सोडली होती.

Siddhi Hande

प्रत्येकाचे आयुष्यात काही न काही बनण्याचे स्वप्न असते. या स्वप्नांसाठी अनेकजण खूप मेहनत करतात. परंतु अनेकदा परिस्थितीमुळे आपण वेगळ्याच दिशेने प्रवास सुरु करतो. परंतु अनेकदा आपल्या स्वप्नांची जाणीव खूप उशिरा होते. परंतु कितीही काहीही झाले तरीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो व्यक्ती प्रयत्न करतो. तोच यशस्वी होते. असंच यश महाराष्ट्राच्या प्रियंवदा म्हाडदळकर यांनी मिळवलं आहे. त्यांनी देशात १३वी रँक तर महाराष्ट्रात पहिल्या आल्या होत्या.

प्रियंवदा या मूळच्या रत्नागिरीच्या रहिवासी. त्यांनी ३१ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्लिअर केली. आज त्या आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. (Maharashtra UPSC Exam 1st Ranker Priyamvada Mhaddalkar)

प्रियंवदा यांनी इन्व्हेस्टमेंट बँकरची नोकरी सोडून यूपीएससी (UPSC)परिक्षेची तयारी केली. २०२१ मध्ये दुसऱ्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. त्यांना आयएएस अधिकारी होण्याची प्रेरणा ही त्यांच्या वडिलांकडून मिळाली. त्या ५ वर्षाची असतानाच त्यांनी कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. परंतु त्यांनी इंजिनियरिंग आणि नंतर एमबीए केले.

प्रियंवदा यांनी आयआयएमम बंगळुरु येथून एमबीएचे (Maharastra) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना परदेशात इन्व्हेस्टमेंट बँकेत नोकरी मिळाली. त्यांनी जवळपास ६ वर्ष नोकरी केली. परंतु नोकरी करत असतानाच आपण आपले स्वप्न विसरले असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. (IAS Success Story)

प्रियवंदा यांनी रोज ९ ते १० तास अभ्यास केला. त्या खूप मॉक टेस्ट द्यायच्या . त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढायचा. प्रियंवदा यांनी स्वतः च्या कष्टाने एवढे मोठे यश संपादन केले आहे. लाखो रुपयांचे पॅकेज सोडून त्यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिवस-रात्र मेहनत घेतली आणि दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (IAS Priyamvada Mhaddalkar Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT