Success Story: फक्त ५ हजारांपासून मायलेकींनी सुरु केला बिझेनस; आता दर महिन्याला करतात लाखोंची कमाई!

Success Story: कोणताही व्यवसाय सुरू करणं जितके सोपं आहे, तितकंच त्याला उंचीवर नेणं कठीण आहे. पण एस हरिप्रियाने तिची आई एस बानूसोबत ऑनलाइन बिझनेस सुरू केला.
Success Story
Success Storysaam tv
Published On

कोणताही बिझनेस सुरु करायचं म्हटलं की, तो चांगला सुरु राहील का हा प्रश्न सर्वांच्या मनात येतो. तोटा होऊ नये यासाठी अनेकजण बिझनेसची आय़डिया काढून टाकतात. कदाचित तुमच्याही मनात कधी ना कधी बिझनेस करण्याचा विचार आला असेल. कोणताही व्यवसाय सुरू करणं जितके सोपं आहे, तितकंच त्याला उंचीवर नेणं कठीण आहे.

मात्र व्यवसायाच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करणारेच यश मिळवतात. असंच काहीसं एका आई आणि मुलीच्या जोडीसोबत घडलंय. एस हरिप्रिया यांनी तिची आई एस बानूसोबत एक व्यवसाय सुरू केला जो आज प्रचंड पैसा कमावतोय.

Success Story
Success Story: 8 हजारांच्या कर्जात सुरू केला बिझनेस, आज आहेत 800 कोटींच्या मालकीण, कोण आहेत मीना बिंद्रा?

एस हरिप्रियाने तिची आई एस बानूसोबत खेळण्यांचा ऑनलाइन बिझनेस सुरू केला. अवघ्या ५ हजारांपासून त्यांनी या बिझनेसला सुरुवात केलं आहे. यावेळी त्यांनी मुलांसाठी अशी खेळणी सुरू केली ज्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास होतो. त्याने आपल्या स्टार्टअपचे नाव एक्सट्रोकिड्स ठेवलंय. हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 5 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यावेळी त्यांना दर महिन्याला 15 हजारांहून अधिक ऑर्डर्स मिळतात.

कशी आली त्यांना बिझनेसची कल्पना?

खेळण्यांचा बिझनेसची कल्पना या माय-लेकींच्या मनात कशी आली हा प्रश्न सर्वांच्या मनात आला असेल. मुळात नवीन पालकांसमोर मोठं आव्हान असतं की, आपल्या मुलाला कसे व्यस्त ठेवावं. ज्यावेळी मूल चालायला लागतं तेव्हा सर्वात मोठी समस्या सुरू होते. अशा परिस्थितीत मुलाला शिक्षण देणं खूप महत्वाचं असतं. त्यावेळी मुलाला मोबाईल किंवा टीव्हीचं व्यसन लागू नये हे सुद्धा महत्त्वाचं असतं. हे लक्षात घेऊन दोन मुलांची आई एस.हरिप्रिया यांनी मुलांना शिक्षण देण्यासाठी व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. या वरूनच त्यांना एक्स्ट्रोकिड्सची कल्पना सुचली आणि त्यांनी ती सत्यात उतरवली.

हा व्यवसाय करणं काहीसं कठीण

हरिप्रिया यांच्या सांगण्यांनुसार, हे काम सोपं नव्हते. तीन महिन्यांचे बाळ आणि लहान मुलाची काळजी घेत त्यांना हा बिझनेस सुरु केला. यावेळी बिझनेससाठी माझ्या आईची साथ मिळाली. पहिल्या ऑर्डरसाठी हरिप्रियाला अनेक महिने वाट पाहावी लागली. इतकंच नाही तर सुरुवातीला नुकसानही सहन करावं लागलं. मात्र आज त्यांच्याकडे 500 हून अधिक खेळण्यांची यादी आहे. तिने 5 लाखांहून अधिक ग्राहकांना ऑर्डर दिलीये.

हरिप्रियाने सांगितलं की, एक वेळ अशी होती जेव्हा तिच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नव्हते. तिने एकदा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यामध्ये विशिष्ट खेळण्याने कसं खेळायचं ते स्पष्ट केलंय. या व्हिडिओमध्ये त्तिची आई देखील होती. मुळात याच व्हिडीओने त्यांचं नशीब पालटलं.

Success Story
Business Idea: फक्त ५० हजारांमध्ये सुरू करा 'हा' बिझनेस; दर महिन्याला करू शकाल लाखोंची कमाई, पाहा कसं?

दर वर्षाला किती कमाई केली जाते?

हरिप्रिया दर महिन्याला सुमारे 3 लाख रुपये कमावते. याशिवाय त्यांच्या खेळण्यांची किंमत 49 रुपयांपासून ते 8,000 रुपयांपर्यंत सुरू आहे. त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या खेळण्यांमध्ये कोडी, मेमरी कार्ड गेम आणि 'शट द बॉक्स' यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com