अनेकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. आजकाल अनेकजण स्वतः चे स्टार्टअप सुरु करतात. असंच एक स्टार्टअप मायलेकीच्या जोडीने सुरु केल होतं. मायलेकीने स्वतःचा एक्स्ट्रोकिड्स नावाचा बिझनेस सुरु केला. फक्त ५००० हजार रुपयांची गुंतवणूक करुन व्यवसाय सुरु केला अन् आज त्या महिन्याला लाखो रुपये कमावतात.
हरिप्रिया आणि तिची आई एस बानू यांनी स्वतः चा खेळण्यांचा व्यवसाय सुरु केला. मायलेकींना ५००० हजार रुपये गुंतवणूक करुन व्यवसाय सुरु केला. या कंपनीला दर महिन्याला १५००० खेळण्यांची ऑर्डर मिळते. यातूम लाखो रुपये कमावले जातात. (Business Success Story)
हरिप्रिया आणि तिची आई एस बानू यांनी लहान मुलांच्या खेळण्याचा व्यवसाय सुरु केली.सुरुवातील त्यांनी खूप कमी खर्चात व्यवसाय सुरु केला. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. त्यांनी Extrokids नावाचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरु केला. आता त्यांना महिन्याला लाखो रुपयांचा ऑर्डर मिळते.
ज्या घरात लहान मुलं असते त्या आईवडिलांना नेहमी त्यांच्याजवळच राहावे लागते. त्यामुळे लहान मुलांच्या करमणुकीसाठी त्यांना खेळणी द्यावी लागतात. हरिप्रिया यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्यांना या व्यवसायाची आयडिया सुचली. लहान मुलांसाठी अशी खेळणी बनवायची ज्यामुळे लहान मुलांच मनोरंजनदेखील होईल आणि त्यांना शिकायलादेखील मिळेल. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. (Extrokids Business success story)
हरिप्रिया यांनी त्यांच्या बिझनेस आयडीयावर खूप रिसर्च केला. त्यानंतर त्यांना मोटर स्किल्स, हात, डोळे आणि मेंदूला विकसित करतील अशा खेळण्यांची माहिती मिळाली. यामध्ये वेगवेगळी पुस्तके,Puzzlesचा समावेश केला. त्यातून त्यांनी अनेक खेळणी तयार केली.
हरिप्रिया यांची महिन्याची कमाई ३ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे ४९ रुपयांपासून ते अगदी ८,००० रुपयांची खेळणी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.