यूपीएससी ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेकजण यशस्वी होतात. त्याचसोबत अपयश आले तरीही न खचता जी व्यक्ती प्रयत्न करते तीच व्यक्ती खरी यशस्वी होते. असंच यश आयएएस अंजू शर्मा यांना मिळालं आहे.
अंजू शर्मा यांना आयुष्यात अनेकदा अपयश आले तरीही त्यांनी न डगमगता आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. अंजू शर्मा या दहावी आणि बारावीच्या परिक्षेत नापास झाल्या होत्या. तरीही न डगमगता त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आणि आयएएस अधिकारी झाल्या. (IAS Success Story)
आयएएस अंजू शर्मा या १२वीत अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या होत्या. तर १०वीत प्री बोर्ड परिक्षेच नापास झाल्या होत्या. परंतु याच अपयशातून त्यांनी प्रेरणा घेतली आणि आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचे ठरवले. त्यानंतर त्यांनी खूप मेहनत केली. आपल्या कमजोर विषयात खास लक्ष दिले. या काळात त्यांच्या आईने त्यांची खंबीरपणे साथ दिली होती.
अंजू शर्मा यांनी कॉलेजमध्ये अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिले. त्यांनी कॉलेजमध्ये गोल्ड मेडलदेखील मिळवले. त्यानंतर त्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी केली. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि पास झाल्या. त्या आयएएस म्हणून कार्यरत आहेत. (IAS Anju Sharma Success Story)
अंजू शर्माने १९९१ मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक पदांवर काम केले. अंजू शर्मा यांनी अपयशातून न खचता यशस्वी कसं व्हायचं, हे जगाला दाखवून दिले. (IAS Anju Success Story)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.