Air Taxi Saam Tv
बिझनेस

Hyundai Air Taxi: हेलिकॉप्टरसारखी हवेत उडणार टॅक्सी! ह्युंदाईच्या पहिल्या इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सीची घोषणा

Air Taxi: ह्युंदाई कंपनी नेहमी नवनवीन उत्पादने लाँच करत असतात. कंपनी आता इलेक्ट्रिक कारनंतर आता इलेक्ट्रिक एअर टॅक्सी लाँच करणार आहे. कंपनीने नुकतेच कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये(CES) आपल्या नवीन फ्लाइंग टॅक्सीचा नवीन प्रोटोटाइप सादर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hyundai First Electric Air Taxi:

ह्युंदाई कंपनी नेहमी नवनवीन उत्पादने लाँच करत असतात. कंपनी आता इलेक्ट्रिक कारनंतर आता इलेक्ट्रिक एअर टॅक्सी लाँच करणार आहे. कंपनीने नुकतेच कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये(CES) आपल्या नवीन फ्लाइंग टॅक्सीचा नवीन प्रोटोटाइप सादर केला आहे.

या कार्यक्रमात कंपनीने eVTOL टॅक्सी ही Uber च्या एअर टॅक्सी नेटवर्कचा एक भाग असेल, असे सांगितले होते. मात्र, आता उबर कंपनीने एअर टॅक्सीचे नेटवर्क दुसऱ्या स्टार्टअपला विकले आहे. (Latest News)

२०२८ पर्यंत उत्पादनासाठी तयार

एअर टॅक्सी इंटस्ट्रीला अजूनही आपली व्यवसायिक सेवा सुरु करण्याची परवानगी मिळालेली नाही. ह्युंदाई कंपनीने नवीन EVATOL एअर टॅक्सीची नवीन आवृत्ती सादर केली आहे. कंपनीच्या या युनिटचे नाव सुपरनल आहे. ही टॅक्सी २०२८ पर्यंत उत्पादनासाठी तयार होईल, असे कंपनीने सांगितले आहे.

या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीत काय खास असेल?

या नवीन एअर टॅक्सीत S-A2 संकल्पनेत 120mph स्पीडवर वेगाने उडू शकते. या टॅक्सीत चांगली बॅटरी देण्यात आली आहे. याच्या मदतीने टॅक्सी २५ ते ४० मैल अंतर कापू शकते. या एअर टॅक्सीत चारजण बसू शकतात.

या एअर टॅक्सीचा आवाजदेखील खूप कमी येईल. एखाद्या डिशवॉशर इतका या टॅक्सीचा आवाज असेल. इलेक्ट्रिक वाहनानंतर आता कंपनीने इलेक्ट्रिक एअर टॅक्सी तयार करण्यावर भर दिला आहे. ज्यामुळे प्रदुषण कमी होईल. हे इलेक्ट्रिक विमान कमी अंतरासाठी तयार केला आहे. सुरुवातील याचे नाव फ्लाइंग कार असे ठेवण्यात आले होते.

Edited By-Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

Raj Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे जाणार राज ठाकरेंच्या घरी, तारीख ठरली?

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात ७ आरोपींच्या घराची झडती, पोलिसांना ड्रग्ज सापडलं नाही, मोबाईल-लॅपटॉप जप्त

पती स्नॅक्स आणायला विसरला आणि पत्नीने केला चाकूहल्ला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT