Scheme For Senior Citizen: ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँकांमध्ये FDवर मिळेल भरघोस व्याजदर; जाणून घ्या सविस्तर

Bank Scheme For Senior Citizen : प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. वेगवेगळ्या योजना, बँकेत, म्युच्युअल फंडात लोक गुंतवणूक करतात. काही बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर भरघोस व्याज देतात. जेणेकरुन त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल.
Scheme For Senior Citeizen
Scheme For Senior CiteizenSaam Tv
Published On

Bank Scheme For Senior Citizen Which Offers More Interest:

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. वेगवेगळ्या योजना, बँकेत, म्युच्युअल फंडात लोक गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांना भविष्यात पैशांची गरज भासत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. सरकारी योजनांसोबतच काही बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना चांगले व्याजदर देतात. ज्यात गुंतवणूक करुन तुम्ही तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करु शकतात.

ज्येष्ठ नागरिकांचे पैसे सुरक्षित रहावे आणि त्यावर चांगले व्याज मिळावे यासाठी सरकारची ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत पैसे गुंतवणूकीवर ८.२ टक्के व्याज दिले जाते. याचसोबत अशा काही बँका आहेत ज्या नागरिकांना एफडीवर जास्त व्याज देतात. (Latest News)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला ८.२ टक्के व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही १ हजार ते ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर कर सूट मिळते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरते. मात्र, याचसोबत अशा काही बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना पैसे गुंतवणूकीवर ८.२ टक्केपेक्षा जास्त व्याज देते.

Scheme For Senior Citeizen
Petrol Diesel Rate (11th January): एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी आज किती पैसे मोजावे लागतील; पुणे- नाशिकसह राज्यातील नवे दर तपासा

1. येस बँक

खाजगी क्षेत्रातील येस बँक ही विश्वासू बँक आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्तीत जास्त ८.२ टक्के व्याज देत आहे.

2. बंधन बँक

बंधन बँक ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना पैसे गुंतवणूकीवर ८.३५ टक्के व्याज देते.

3. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उज्जीवन स्माॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना ८.७५ टक्के व्याज देते.

4. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना ९.६ टक्के व्याज देते.

5. जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्के व्याज देते.

6. ESAF स्मॉल फायनान्स बँक

ESAF स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूकीवर ९ टक्के व्याजदर देते.

7. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना एफडीवर ८.६ टक्के व्याजदर देते.

8. युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ९.५ टक्के व्याज देते.

Edited By- Siddhi Hande

Scheme For Senior Citeizen
Gold Silver Rate (11th January 2024): सोन्याच्या भावात वाढ, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com