Hit And Run Act : संभाजीनगरात रिक्षा चालक-मालक संघटनेचा मोर्चा; मनमाडमध्ये टॅक्सी चालकांचा संप

Sambhajinagar News : नवीन कायदा तात्काळ रद्द करून ड्रायव्हर सुरक्षा कायदा लागू करावा अशी मागणी रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Hit And Run Act
Hit And Run ActSaam tv
Published On

रामू ढाकणे/ अजय सोनवणे 

छत्रपती संभाजीनगर/मनमाड : हिट अँड रन कायद्याचा विरोध करण्यासाठी चालक- मालक संघटनेने पुन्हा आंदोलन पुकारले आहे. यात आज (Sambhajinagar) संभाजीनगर शहरात रिक्षा चालक-मालक संघटनेचा मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर मनमाडमध्ये (Manmad) देखील टॅक्सी चालकांनी संप पुकारला आहे. (Live Marathi News)

Hit And Run Act
Truck Driver Strike : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालक पुन्हा आक्रमक; पवनीत स्टेअरिंग छोडो आंदोलन

हिट अँड रन (Hit And Run) कायद्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक मालक संघटनेने संप पुकारल्याने बहुतांश रिक्षा चालक संपात सहभागी झाले आहेत. शहरातील बाबा पेट्रोल पंप ते विभागीय आयुक्त कार्यालय पर्यंत रिक्षा चालकांनी मोठा मोर्चा काढून या कायद्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने रिक्षा चालक- मालक संघटनेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. सरकारने हा नवीन कायदा तात्काळ रद्द करून ड्रायव्हर सुरक्षा कायदा लागू करावा अशी मागणी रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hit And Run Act
Naylon Manja : नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई; ५ हजाराचा दंड

मनमाडला टॅक्सी चालकांचा संप
हिट अँड रन कायद्याविरोधात आता नाशिकच्या मनमाडमध्ये टॅक्सी चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलनाला सुरवात केली. टॅक्सी चालक आंदोलनात सहभागी झाल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. टॅक्सी चालकांनी (Manmad) कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला. हिट अँड रन कायदा चालकांवर अन्यायकारक असून हा कायदा तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी  टॅक्सी चालक संघटनेने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com