Naylon Manja : नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई; ५ हजाराचा दंड

Jalgaon News : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविले जात असल्याने यासाठी नायलॉन, चायनीस मांजाचा सर्रास वापर केला जात असतो. या मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत
Naylon Manja
Naylon ManjaSaam tv
Published On

जळगाव : नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना शहरात रस्त्यावर विक्री केली जात असल्याचा प्रकार (jalgaon) जळगावमध्ये समोर आला. या मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या पथकाने धाड टाकत कारवाई केली आहे. (Chinese Manja) मांजा जप्त करत ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Naylon Manja
Dombivali Crime: दारू पिताना खुर्चीला लागला धक्का; वादात पिस्तुल काढत झाडली गोळी, एक जखमी

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविले जात असल्याने यासाठी नायलॉन, चायनीस मांजाचा सर्रास वापर केला जात असतो. या मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे मांजा विक्री व वापरास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील मांजाची विक्री केली जात असल्याचा प्रकार सुरु आनंद अशांविरुद्ध महापालिकेने (Jalgaon Corporation) तपासणी करत कारवाईला सुरवात केली आहे. यासाठी पथक तयार केले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Naylon Manja
Truck Driver Strike : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालक पुन्हा आक्रमक; पवनीत स्टेअरिंग छोडो आंदोलन

दुकानांची तपासणी 

पथकाने जोशी पेठेतील पतंग गल्लीत नऊ विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली असता एकाही जणाकडे मांजा आढळून आला नाही. एका दुकानाची तपासणी होत असतानाच अन्य विक्रेते सावध झाल्याची चर्चा आहे. मात्र ख्याँजामिया दर्ग्याजवळ मात्र एका जणाजवळ एक किलो मांजा आढळून आला. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत जागेवरच पाच हजाराचा दंड आकारण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com