Post Office Scheme: योजना एक, फायदे अनेक; पोस्ट ऑफिसच्या या योजनेत चांगलं व्याज आणि लोनही मिळेल

Post Office Scheme Benefit: नागरिकांच्या भविष्यासाठी अनेक सरकारी योजना, बँक स्कीम, पोस्ट ऑफिसच्या योजना असतात. यामध्ये गुंतवणूक केल्यास नागरिकांना चांगले व्याजदर मिळते.
Post Office Scheme
Post Office SchemeSaam TV
Published On

Post Office Recurring Deposit Scheme:

नागरिकांच्या भविष्यासाठी अनेक सरकारी योजना, बँक स्कीम, पोस्ट ऑफिसच्या योजना असतात. यामध्ये नागरिकांना चांगले व्याजदर मिळते. पोस्ट ऑफिसची स्मॉल सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास नागरिकांना चांगले व्याजदर मिळते. तसेच पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये रिटर्न मिळण्यासोबत अनेक लोनच्या सर्विसदेखील मिळते. त्यामुळे नागरिकांना खूप फायदा होतो.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्याचसोबत तुम्ही कर्जदेखील काढू शकता. या योजनेत तुम्ही प्रत्येक महिन्याला काही पैसे गुंतवू शकतात. यावर तुम्हाला निर्धारित व्याज मिळेल. (Latest News)

पोस्ट ऑफिस आरडी खात्यावर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. जर तुम्हाला आरडीवर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला १२ हप्ते जमा करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला या योदनेत गुंतवणूक करुन १ वर्ष पूर्ण झालेले असावे. आरडी खातेधारकाला पोस्ट ऑफिसमधून त्याच्या खात्यातील रकमेवर ५० टक्के व्याज मिळू शकते. कर्जाची रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते. पोस्ट ऑफिसमधून घेतलेल्या कर्जावर आरडीच्या व्याजदरापेक्षा २ टक्के जास्त व्याज द्यावे लागले. जर तुम्हाला आरडीवर ६.३ टक्के व्याज मिळत असेल तर तुम्हाला कर्ज काढल्यास ८.३ टक्के व्याजदर मिळेल.

आरडीवर कर्ज कसे घ्यायचे

आरडी खात्यावर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पासबुकसह कर्जाचा फॉर्म भरावा लागले. त्यानंतर सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पोस्ट ऑफिसमधून कर्ज मिळेल.

पोस्ट ऑफिस आरडीवर किती व्याजदर मिळते?

पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही दर महिन्याला ५ हजार रुपये गुंतवणूक करत असाल तर त्यावर पाच वर्षांनी ६.७ टक्के व्याज मिळेल. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ३,५६,८३० रुपये मिळतील.

Post Office Scheme
Gold Silver Rate (11th January 2024): सोन्याच्या भावात वाढ, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

पोस्ट ऑफिसमधील इतर योजनांचे व्याजदर

  • आरडी (RD)- व्याजर ६.७ टक्के

  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)- ७.७ टक्के व्याजदर

  • किसान विकास पत्र (KVP)- ७.५ टक्के व्याजदर

  • पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF)- ७. १ टक्के व्याजदर

  • सुकन्या समृद्धी योजना- ८.२ टक्के व्याजदर

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना- ८.२ टक्के व्याजर

  • मासिक उत्पन्न योजना- ७.४ टक्के योजना

    Edited By- Siddhi Hande

Post Office Scheme
Scheme For Senior Citizen: ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँकांमध्ये FDवर मिळेल भरघोस व्याजदर; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com