Small Saving Scheme : सरकारचा मोठा निर्णय! पाच वर्षांच्या RD वर व्याज वाढणार; अल्प बचत योजनेत बदल नाही

RD Interest Rate : सरकारने आरडी (रिकरिंग डिपॉझिट) संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
RD Interest Rate
RD Interest Rate Saam Tv
Published On

RD Interest Rate Increase :

सरकारने आरडी (रिकरिंग डिपॉझिट) संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांच्या आरडी योजनेवरील व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. हा व्याजदर 6.5 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने इतर लहान बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, लहान बचत खात्यावरील व्याजदर हा पूर्वीप्रमाणेच 4 टक्के असणार आहे.

RD Interest Rate
₹2000 Note Exchange : 2000 च्या नोटांसंदर्भात मोठी अपडेट; RBI ने नेमकं काय सांगितलं?

पीपीएफच्या व्याजदरांमध्ये बदल नाही

लहान योजनांसोबत पीपीएफ योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, एका वर्षाच्या मुदत ठेवींवर 6.9 टक्के व्याज मिळणार आहे. दोन आणि तीन वर्षांच्या मुदत ठेंवीवर 7 टक्के तर 5 वर्षांवर 7.5 टक्के व्याज आहे. याचसोबत मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी ठेवींवरील व्याजदर 8 टक्के ठेवण्यात आले आहे.

सरकारी योजनांवरील व्याजदर किती

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) 8.2 टक्के

  • मासिक उत्पन्न खाते योजना (MIS)7.4 टक्के

  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) 7.7 टक्के

  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) 7.1 टक्के

  • किसान विकास पत्र (KVP) 7.5 टक्के

RD Interest Rate
Stomach Gas Problem : सावधान! पोटातला गॅस दूर करणाऱ्या औषधांचे सेवन करणे टाळा, होईल हा गंभीर आजार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com