
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनेनुसार आज (30 सप्टेंबर) ही 2000 रुपयांच्या नोटा बदली करण्याची अंतिम तारीख आहे. जर तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असेल तर आजच बदलून घ्या. 1 ऑक्टोबरपासून या नोटांचे मूल्य शून्य असणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा तुम्ही बदली करु शकणार आहात. आज नोटा बदलण्याची अंतिम तारीख आहे. 1 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत.
मुदतीनंतर 2000 रुपयांच्या नोटा वापरु शकणार नाही
30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांच्या नोटा तुम्ही वापरु शकणार नाही. त्या नोटांची किंमत शून्य असणार आहे. तसेच 30 सप्टेंबरनंतर या नोटा बदलून दिल्या जाणार नाही.
2000 रुपयांच्या नोटा कशा बदलाव्यात
2000 नोटा बदलण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन तुम्ही या नोटा बदलू शकता.
नोट बदलण्यासाठी जवळच्या बँकेला भेट द्या
नोट बदलण्यासाठी रिक्वेस्ट स्लिप (Request Slip) भरा
आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटिंग आयडी, पासपोर्ट यांच्यासह तुमची माहिती भरा
किती नोटा बदली करायच्या आहेत त्याची माहिती भरा
नोट बदली करण्यासाठी मर्यादा
मध्यवर्ती बँकानी नोट बदली करण्यासाठी काही लिमिट निश्चित केल्या आहेत. आरबीआयने यासंबंधित काही नियम आणि सूचना दिल्या आहेत. यानुसार एका वेळी तुम्ही 20000 रुपये बँकेत डिपॉझिट करु शकता. जर तुम्हाला 50000 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे डिपॉझिट करण्यासाठी पॅन कार्ड डिटेल्स दाखवावे लागेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.