Diabetes News: धक्कादायक! तरुणांमध्ये वाढतेय शुगरचे प्रमाण, सर्वेक्षणातून सिद्ध

Increasing Level Of Diabetes In Youth : गणेशोत्सव काळात झालेल्या एक सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Diabetes News
Diabetes NewsSaam Tv
Published On

Survey Of Diabetics :

गणेशोत्सव काळात झालेल्या एक सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सणासुदीच्या दिवसात तरुणांमध्ये सर्वाधिक डायबिटिजचे प्रमाण दिसून आले. दिवसेंदिवस 1/4 तरुणांमध्ये रक्तात साखरेचे प्रमाण जास्त आढळत आहे. असे सर्वेक्षणात दिसून आले आहेत.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर एका हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. तेथे तब्बल 10,000 लोकांची HbAlc टेस्ट करण्यात आली. त्यापैकी एकूण 41% लोकांमध्ये असंतुलित HbAlc चे प्रमाण आढळून आले. ही माहिती आय फाउंडेशनचे डॉ निशांत कुमार यांनी दिली.

Diabetes News
Hair Care Tips : केस गळतायत? हे घरगुती उपाय करा; नक्कीच फरक पडेल

41 टक्क्यांपैकी 15 टक्के लोकांमध्ये HbAlc चे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळले. त्यामुळे त्यांना डायबिटिज असल्याचे निदान झाले. तर उरलेले 26% लोक प्री डायबिटिज स्टेजवर आहे. या कॅम्पमध्ये ज्या लोकांनी टेस्ट केल्या त्यातील 50% लोक हे 20-40 वयोगटातील होते. तर 41% लोक 40-60 वयोगटातील होते. या दोन्ही वयोगटाच्या तुलनेत जवळपास 25% तरुण पिढीच्या रक्तात साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचे आढळले.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तरुणांमधील वाढते डायबिटिजचे प्रमाण शरीरावर परिणाम करते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, बदलती जीवनशैली, फास्ट फूड आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स. तरुणांमध्ये फास्ट फूड खाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ते डायबिटिजसारख्या आजाराला बळी पडत आहेत. डायबिटिजचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे कामाचे ठिकाण.

आजकाल सर्वजण 8-10 तास लॅपटॉपसमोर बसून काम करतात. त्यामुळे त्यांच्या शारीरीक हालचाली कमी होतात. परिणामी त्यांना डायबिटिज सारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

जवळपास 50% भारतीयांना आतापर्यंत मधुमेह असलेल्या लोकांचे निदान झालेले नाही. ज्यांना निदान झाले आहे त्यांची क्वचितच तपासणी केली जाते. त्यामुळे कमी लोकांपर्यंत आजाराबाबत जनजागृती होतेय आणि त्यावर उपाय केले जातात. निदान झाल्यानंतर योग्य उपाय केल्यानंतर हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाचे आजार, अंधत्वासारखे आजार टाळू शकतात. असे डॉ कुमार यांनी सांगितले.

Diabetes News
Dmart Success Story: छोट्याशा खोलीतून उभारलं कोटींचं साम्राज्य, वर्षभर डिस्काउंट मिळणाऱ्या D-Mart ची अशी होती कहाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com