Dmart Success Story: छोट्याशा खोलीतून उभारलं कोटींचं साम्राज्य, वर्षभर डिस्काउंट मिळणाऱ्या D-Mart ची अशी होती कहाणी

Dmart Story : राधाकिशन दमानी यांनी डीमार्टची सुरुवात केली.
Dmart Sucess Story
Dmart Sucess StorySaam Tv
Published On

Dmart Founder Success Story :

आजकाल सर्वजण शॉपिंग करताना काही न काही ऑफर शोधत असतात. यात सर्वात जास्त ऑफर आणि डिस्काउंट देणारे स्टोर म्हणजे डीमार्ट. डीमार्टमध्ये कधीही गेलात तरी तुम्हाला लांबच लांब रांगा पाहायला मिळतील. याच डीमार्ट ची सुरुवात कशी झाली कोणी केली हे तुम्हाला माहित आहे का याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

राधाकिशन दमानी यांनी डीमार्टची सुरुवात केली. डिमार्टची संकल्पना ही राधाकिशन दमानी यांच्या डोक्यात सर्वप्रथम आली. राधाकिशन दमानी यांचा डीमार्टच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे. आज राधाकिशन दमानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

Dmart Sucess Story
Chanakya Niti On Behaviour : तुमचा स्वभाव कितीही चांगला असला तरीही हा एक गुण तुम्हाला वाईट ठरवेल

डीमार्टची सुरुवात

शेअर बाजारात मोठं नाव असणाऱ्या राधाकिशन दमानी यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. १९९१ मध्ये त्यांनी नेरुळची फ्रँचायझी घेतली. त्यात ते अयशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी बोअरवेल बांधण्याची कंपनी सुरुवात केली. परंतु यातही त्यांचा हात बसला नाही.

2002 मध्ये मुंबईत पहिले डीमार्ट स्टोअर उघडले. कधीच कोणत्याही भाड्याच्या जागेत डीमार्ट स्टोअर उघडणार नाहीत असे त्यांनी ठरवले. आज डिमार्टचे देशभरात जवळपास ३००हून अधिक स्टोअर्स आहेत. फक्त स्टोअर्स नाहीत तर 300 मोठ्या आकाराच्या जमिनीदेखील आहे. ही दुकाने 11 राज्यांमध्ये पसरलेली आहे.

डीमार्टचे सामान इतके स्वस्त कसे असते

राधाकिशन दमानी यांनी स्वतः च्या जागेवर डीमार्ट स्टोअर उघडल्याने याची त्यांना खूप मदत झाली. कोणत्याही प्रकारचे भाडे द्यायला न लागल्याने त्यांची तेवढी बचत झाली. त्यामुळेच डीमार्टमधील वस्तू या स्वस्त किंमतीत विकल्या जातात. त्याचप्रमाणे डीमार्टचे एक उद्दिष्ट असते की, माल 30 दिवसांच्या आत संपला पाहिजे. त्यामुळेही ते सवलती देतात. याशिवाय डीमार्ट सर्व कंपन्याना लवकर पेमेंट करते. त्यामुळे उत्पादक त्यांना सवलतीत वस्तू पुरवतात. याच सवलती पुढे ग्राहकांना दिल्या जातात.

Dmart Sucess Story
Amazon : Amazon वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, बोटपासून फायर बोल्टसारख्या ब्रँडवर ऑफर्स, किंमत पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com