Hair Care Tips : केस गळतायत? हे घरगुती उपाय करा; नक्कीच फरक पडेल

Home Remedies for Dry Hair : केस गळतीसाठी हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.
Hair Care Tips
Hair Care TipsSaam Tv
Published On

Natural Products For Silky Hair :

आजकाल सर्वांचेच जीवन खूप व्यस्त झाले आहे. त्यामुळे स्वतः च्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीये. शरीरासोबतच आपण आपल्या केसांची निगा राखत नाही. त्यामुळे केस खूप गळतात, कोरडे होतात, केसांची वाढ खुंटते अशा खूप समस्यांना तोंड द्यावे लागते.

सध्या अनेक महिलांमध्ये केसगळतीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यासाठी अनेक केमिकल युक्त शॅम्पूचा वापर करतात. त्यामुळे केसांचे खूप नुकसान होते. त्यामुळे नेहमी नैसर्गिक आणि घरगुती उपाय ट्राय करा. आज आम्ही तुम्हाला केसांसाठी असेच काही घरगुती उपाय सांगणर आहोत. जेणेकरुन तुमचे केस मऊ, मजबूत होतील.

Hair Care Tips
Dmart Success Story: छोट्याशा खोलीतून उभारलं कोटींचं साम्राज्य, वर्षभर डिस्काउंट मिळणाऱ्या D-Mart ची अशी होती कहाणी

1. खोबरेल तेल

खोबरेल तेल हा केसांसाठी सर्वात चांगला उपाय आहे. खोबरेल तेल हे नैसर्गिक आणि केसांसाठी चांगले आहे. केस धुण्याआधी खोबरेल तेल लावा. त्यामुळे केस मजबूत होतील. केस तुटणे किंवा गळणे कमी होईल.

2. अंडी

अंडी हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. कंडिशनर लावल्यानंतर जसे केस मऊ होतात. तसेच केस अंडी लावल्यानंतर होतात. केस धुण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग केसांना लावा. त्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवा. तुमचे केस मऊ होतील.

3. दही

दही हे केसांसाठी खूप फायद्याचे असते. केस धुण्याआधी १ तास दही लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. दही लावल्याने केसातील कोंडा दूर होतो.

4. केळी आणि मध

केळी आणि मध हे केसांसाठी खूप फायदेशीर असते. केस धुण्यापूर्वी केळी आणि मध एकत्र डोक्याला लावा. यासाठी दोन पिकलेली केळींमध्ये त्यात मध मिसळा. हे केसांना लावा. त्यानंतर १ तासानंतर केस धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Hair Care Tips
Petrol Diesel Price Today (30 September) : वीकेंडला घराबाहेर पडताय? पेट्रोल- डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com