Stomach Gas Problem : सावधान! पोटातला गॅस दूर करणाऱ्या औषधांचे सेवन करणे टाळा, होईल हा गंभीर आजार

Gas Problem : आजकाल बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार होत आहेत.
Stomach Gas Problem
Stomach Gas ProblemSaam Tv
Published On

How To Get Rid Of Gas Pain :

सध्या बदलत्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. फास्ट फूड खाल्याने अनेकदा पोटाचे आजार होतात. गॅस होणे, पोटात जळजळ होणे यामुळे अनेक समस्या होतात.

पोटाच्या गॅसच्या आजारासाठी आपण औषधे घेतो. परंतु ही औषधे रोज घेणे शरीरासाठी हानिकारक असतात. या औषधांमुळे तुम्हाला किडनीचा त्रास होऊ शकतो. तर ४ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस या औषधांचे सेवन केल्यास तुमच्या पोटातील अॅसिड निघून जाईल. यामुळे पोटाचे आजार होतील.

Stomach Gas Problem
₹2000 Note Exchange : 2000 च्या नोटांसंदर्भात मोठी अपडेट; RBI ने नेमकं काय सांगितलं?

गॅसच्या आजारासाठी Indian Society of Gastroenterology ने गॅसच्या औषधांबाबत नवीन तत्वे जारी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आजवर केलेल्या संशोधनात जे लोक खूप काळ गॅसच्या समस्येवर औषधे घेतात.त्यामुळे त्यांच्यात आयन आणि विटामिन बी 12 ची कमतरता असल्याचे जाणवते. त्यामुळे यासंबंधित गाइडलाइन जारी करणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्हीही गॅसच्या आजारावर औषधे घेत असाल तर तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही घरगुती उपाय करा. जेणेकरुन कोणतेही वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही.

योगासने

योगासने करणे हे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तंदुरुस्त आरोग्यासाठी रोज योगासने केली पाहिजे. पोटात गॅसची समस्या असेल तर काही ठरावीक योगासने करावी. गॅस दूर करण्यासाठी पवनमुक्तासन, प्राणायम यासारखी आसने नियमितपणे करावी.

सोडा

पोटात गॅस झाल्यावर सोडा प्यावा. सोडा प्यायल्यावर गॅस बोहर पडतो. एका ग्लाससाठी अर्धा चमचा सोडा टाकावा. सोडा टाकताना प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

ओवा

ओव्याचे सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते. ओव्यात थायमॉल असते. ज्यात ग्रॅस्टिक रस असतो. हे पचनासाठी उपयुक्त असते. त्यामुळे गॅसचा त्रास झाल्यास ओवा खावा.

Stomach Gas Problem
Diabetes News: धक्कादायक! तरुणांमध्ये वाढतेय शुगरचे प्रमाण, सर्वेक्षणातून सिद्ध

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com