Adani News  Saam TV
बिझनेस

Adani News : श्रीमंतांच्या यादीत अदानींनी घेतली अंबानींची जागा; पुन्हा पटकावले अव्वल स्थान

Ruchika Jadhav

भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. सुमारे ११.६ लाख कोटी इतक्या संपत्तीसह त्यांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे.

गुरुवारी ‘हुरुन इंडिया रिच’ने आपली यादी जाहीर केली. यामध्ये अदानींचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत मुकेश अंबानींकडे असलेली संपत्ती २५ टक्क्यांनी वाढली असून एकूण संपत्ती १०.१४ लाख कोटी रुपये एवढी झाली आहे. तर अदानी यांची संपत्ती ११.६ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.

हिंडेनबर्ग ठरला वरदान?

काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्गने अदानींवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतरही अदानी समुहाने यंदा मोठी गरुड झेप घेतलेली दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अदानींची संपत्ती तब्बल ९५ टक्क्यांनी वाढली आहे. अदानी कुटुंबीयांची एकूण संपत्ती ११,१६१,८०० आहे. यामध्ये अदानी पोर्ट्स, अदानी एनर्जी, अदानी गॅस आणि अदानी पॉवर या शेअर्सने जवळपास ७६ टक्क्यांनी तेजी नोंदवली आहे.

सलग ५ वर्षांत ६ व्यक्ती टॉप १० मध्ये

सलग ५ वर्षांपासून टॉप १० च्या यादीत ६ व्यक्तींची सारखीच आहेत. यामध्ये गौतम अदानी आणि कुटुंबीय यंदा आघाडीवर असून मुकेश अंबानींनी दुसरा क्रमांक पटकावलाय. तर शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर सायरस एस पूनावाला गोपीचंद हिंदुजा आणि राधाकिशन दमानी ही दोन नावे देखील टॉप १० च्या यादीत ५ वर्षांपासून कायम आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT